loksabha 2019 : 'या' स्टार अभिनेत्री राजकारणाच्या मैदानात, पाहा कोणत्या पक्षातून लढणार

लोकसभेच्या आखाड्यात आता कलाकार आणि खेळाडूही उतरले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 11:16 AM IST

loksabha 2019 : 'या' स्टार अभिनेत्री राजकारणाच्या मैदानात, पाहा कोणत्या पक्षातून लढणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ४२ जागांसाठी तृणमृल काँग्रेसकडून लोकसभा निवडणुका लढवणाऱ्यांच्या नावांची यादी जाहीर केली. विशेष म्हणजे त्यांच्या या यादीत ४०.५ टक्के महिला उमेदवार आहेत.

यावेळी ममता यांनी त्यांच्या पक्षातून पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती या निवडणूका लढवणार असल्याचं घोषित केलं.

मिमी २००८ पासून बंगाली सिनेमांमध्ये सक्रीय आहे. मिमीचं जन्म जलपैगुरी शहरात झाला. तर बालपणाचा काही काळ तिने अरुणाचल प्रदेश येथे घालवला. तिने कोलकत्यातील आशुतोष कॉलेजमधून इंग्रजी लिट्रेचरमध्ये पदवी घेतली.

Loading...

दरम्यानच्या काळात मिमी मॉडेलिंगही करत होती. मॉडेलिंग क्षेत्रात असतानाच तिने २००८ मध्ये आपलं लक्ष बंगाली सिनेसृष्टीकडे वळवलं. गानर ओपेरे या मालिकेतून ती सर्वांच्या लक्षात आली.

३० वर्षीय मिमी जादवपुर मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. मिमीने ‘बपी बरी जा’ या सिनेमात पहिल्यांदा काम केले. आतापर्यंत मिमीने २० हून अधिक सिनेमांत काम केले. ‘मोन जाने ना’ हा तिचा आगामी सिनेमा आहे.

ममता बॅनर्जींनी चित्रपट कलाकारांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवले आहे. यात मुनमुन सेन, शताब्दी रॉय, दीपक अधिकारी यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ या मॉडेलिंग क्षेत्रातून अभिनयाकडे वळलेल्या अभिनेत्रीही राजकारणात उतरल्या आहेत.

दक्षिणात्या अभिनेता प्रकाश राज यांनी बेंगलुरु मध्य लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी भाजपा उमेदवार पीसी मोहन माने आहेत. तसेच आम आदमी पक्षाने प्रकाश राज यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

चित्रपट कलाकारांसोबत क्रिकेटपटूही लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला. तो दिल्लीतून निवडणूक लढवू शकतो.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने अनेक कलाकारांना संधी दिली आहे. आसनसोल इथून सध्याच्या खासदार आणि अभिनेत्री मुनमुन सेन निवडणूक लढणार आहेत.

बंगाली अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल नुसरत जहां हीसुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. ममता बॅनर्जी यांनी तिला बशीरहाट येथील उमेदवारी दिली आहे.

नुसरत जहां प्रमाणेच मिमी चक्रवर्तीनेदेखील ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता देव हेदेखील राजकारणात उतरणार आहेत. 2014 मध्ये त्यांनी विजय मिळवला होता.

अभिनेता विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असलेल्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानतंर लेखक जावेद अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत आपले नाव पाहून त्यांना धक्काच बसला होता. आपण कोणतेही काम केले नसताना यात त्यांचे नाव असल्याने अख्तर यांनी आश्चर्य  व्यक्त केले.

उत्तर प्रदेशातून मथुरा लोकसभा मतदारसंघातून डान्सर सपना चौधरी काँग्रेसकडून लढण्याची शक्यता आहे. जर सपना चौधरीला तिकीट मिळाले तर तिच्यात आणि हेमा मालिनी यांच्यातील लढत पहायला मिळेल.

भाभीजी घर पर है या मालिकेतून स्टार झाल्यानंतर बिग बॉसची विजेता ठरलेल्या अभिनेत्री शिल्पा शिंदेने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

शिल्पाच्या पाठोपाठ अभिनेत्री अर्शी खान हिनेदेखील कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 11:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...