Home /News /entertainment /

'मी माझ्या आजीला..' साईशा शिंदेने सांगितली आजीची 'ती' आठवण; शेअर केला नऊवारीतील PHOTO

'मी माझ्या आजीला..' साईशा शिंदेने सांगितली आजीची 'ती' आठवण; शेअर केला नऊवारीतील PHOTO

एकता कपूर निर्मित आणि कंगना रणौत होस्टेड 'लॉकअप' (LockUpp) या रिऍलिटी शोमुळे डिझायनर साईशा शिंदे (Saisha Shinde) प्रचंड चर्चेत आली होती. या शोमध्ये ती आपल्या खास अंदाजात दिसून आली होती. शो संपल्यानंतरसुद्धा ती सतत चर्चेत असते.

  मुंबई,18 जून-  एकता कपूर निर्मित आणि कंगना रणौत होस्टेड 'लॉकअप'  (LockUpp) या रिऍलिटी शोमुळे डिझायनर साईशा शिंदे (Saisha Shinde)  प्रचंड चर्चेत आली होती. या शोमध्ये ती आपल्या खास अंदाजात दिसून आली होती. शो संपल्यानंतरसुद्धा ती सतत चर्चेत असते. साईशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या प्रत्येक पोस्टने ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. आजही असंच काहीसं झालं आहे. या डिझायनरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक खास पोस्ट लिहीत नऊवारीमधील आपला फोटो शेअर केला आहे. साईशा शिंदे सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र तिची नवी पोस्ट फारच खास आहे. या फोटोमध्ये ती चक्क नऊवारी साडी आणि पारंपरिक लुकमध्ये दिसून येत आहे. सोबतच साईशाने एक खास पोस्टसुद्धा लिहली आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहेत. शिवाय आपल्या लाडक्या आज्जीचा उल्लेखदेखील एकला आहे. साईशाची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तिचे कलाकार मित्र आणि चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आपलं प्रेम व्यक्त करत आहेत.
  साईशा शिंदे पोस्ट- साईशाने पोस्टमध्ये लिहिलंय, ''लहानपणापासून मी माझ्या आजीला "नऊवारी" साडी किंवा 9 यार्ड साडी नेसलेली पाहिली आहे. ती कशी नेसवली जाते याबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटायचं. आणि मी लहानपणी बंद दरवाजां मागे ते नेसण्याचा प्रयत्नदेखील केला. आणि अनेकदा या गाण्यावर नृत्यदेखील केलंय. हे सर्व कधी सत्य होईल असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता! आणि आज आम्ही येथे आहोत! सर्व महाराष्ट्रीय महानतेत सजलेले!'' असं म्हणत साईशाने पोस्ट शेअर केली आहे. (हे वाचा:प्रतीक्षा संपली! Taarak Mehta.. ला मिळाली नवी दयाबेन;'ही' अभिनेत्री घेणार दिशा वकानीची जागा? ) खरं तर, साईशा शिंदेने लिंगबदल शस्त्रक्रिया करुन घेतली आहे.ती आधी स्वप्नील या नावाने ओळखली जात होती. परंतु शस्त्रक्रियेद्वारे साईशाने आपल्यात बदल करुन घेतला. आणि आता ती एका मुलीच्या रूपात आपलं नवीन आयुष्य जगत आहे. दरम्यान हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा 'किताब जिंकल्यानंतर साईशा शिंदे चर्चेत आली होती. साईशानेच हरनाज संधूचा फिनाले गाऊन डिझाइन केला होता. ज्यासाठी तिचं प्रचंड कौतुक झालं होतं.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Instagram post, Tv shows

  पुढील बातम्या