• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Lockdown मध्ये स्टार अभिनेता खेळत होता जुगार, पोलिसांनी टाकली धाड आणि...

Lockdown मध्ये स्टार अभिनेता खेळत होता जुगार, पोलिसांनी टाकली धाड आणि...

पोलिसांनी फ्लॅट आणि सोसायटीचे दरवाजे बंद केल्याने कुणालाच बाहेर पडता आलं नाही. आता पोलीस त्या सर्व 11 जणांची चौकशी करत आहेत.

 • Share this:
  चेन्नई 28 जुलै: देशातल्या अनेक महानगरांमध्ये काही दिवसांसाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांनी काटेकोर नियमांचं पालन करावं असे आदेश आहेत. मात्र असं असतांनाही काही लोक या नियमांलं उल्लंघन करतांना आढळून येत आहेत. चेन्नईत पोलिसांनी प्रसिद्ध तामिळ अभिनेता शाम (Shaam) याला जुगार खेळतांना अटक केली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या आधी अनेक अभिनेत्यांच्या अनेक कहाण्या चर्चेत आल्या होत्या. मात्र पहिल्यांदाच एका अभिनेत्याला पोलिसांनी दणका दिला आहे. पोलिसांना एका पॉश सोसायटीत एका फ्लॅट्समध्ये जास्त लोक आल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या फ्लॅटवर धाड टाकली. तेव्हा त्यांना धक्कादायक दृश्य दिसलं. तो फ्लॅट प्रसिद्ध अभिनेता शाम याचा होता. शाम आणि इतर तर 11 जण जुगार खेळत असल्याचं पोलिसांना आढळून आलं. पोलिसांनी शाम यांना अटक केली आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या अन्य 11 लोकांनाही अटक करण्यात आली आहे. शाम यांच्या फ्लॅटवर पोलीस येताच त्यांची एकच धावपळ झाली. पण पोलिसांनी फ्लॅट आणि सोसायटीचे दरवाजे बंद केल्याने कुणालाच बाहेर पडता आलं नाही. आता पोलीस त्या सर्व 11 जणांची चौकशी करत आहेत. नात आणि सुनेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर महानायकाला कोसळलं रडू! प्रसिद्ध आणि नामांकित लोकांनीच जर नियमांचं पालन केलं नाही तर सामान्य लोक काय करतील असा सवाल पोलिसांनी केला आहे. चेन्नईच्या ननगम्बकम (Upscale Nungambakkam) या भागात शाम याच्या मालकीचा फ्लॅट आहे. जुगारात हारल्यामुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. ऑनलाईन जुगार खेळतांना त्याने 20 हजार रुपये गामावले होते. त्याच्याजवळ काही टोकनही सापडले होते. जुगार खेळतांना त्याचा वापर केला जातो. कार्तिकीचा साखरपुडा संपन्न! सर्वांची लाडकी Little Champ अडकणार विवाहबंधनात त्या टोकनची माहिती काढत असतांना पोलिसांना शाम यांच्या फ्लॅट्सची माहिती मिळाली होती. लॉकडाऊनच्या काळात जास्त लोकांनी एकत्र येऊ नये असे नियम असतांनाही शाम यांच्या फ्लॅटवर एवढे लोक आले कसे याची चौकशी पोलीस करत आहेत.
  Published by:Ajay Kautikwar
  First published: