भूमि पेडणेकर लॉकडाऊनमध्ये करतेय शेती, PHOTOS पाहून बसणार नाही विश्वास

भूमि पेडणेकर लॉकडाऊनमध्ये करतेय शेती, PHOTOS पाहून बसणार नाही विश्वास

भूमि पेडणेकर सध्या लॉकडाऊनमध्ये घरी राहून शेती करत असून चाहत्यांनी तिच्या या कामाचं कौतुक केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 26 एप्रिल : देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. ज्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांना सक्तीनं घरी राहवं लागत आहे. अनेकांना या लॉकडाऊनचा कंटाळा आला आहे मात्र काही लोक असे सुद्धा आहेत ज्यांनी हा वेळ सुद्धा सत्करणी लावला आहे आणि तो चांगल्याप्रकारे स्पेंड करत आहेत. अभिनेत्री भूमि पेडणेकरनं सुद्धा असंच काही केलं आहे. ज्यामुळे तिचा लाकडाऊनचा वेळ चांगला जात आहे.

भूमि पेडणेकर सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये घरीच भाज्यांचं पिक घेत आहे. तिनं या भाज्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. जे पाहिल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. भूमिनं घरच्या घरी मेथी, हिरवी मिरची, वांगी आणि स्ट्रॉबेरी यांची रोपं छोट्या छोट्या कुंड्यामध्ये लावली आहेत. हे फोटो शेअर करताना तिनं लिहिलं, बरीच वाट पाहिल्यावर आणि बरीच काळजी घेतल्यानंतर आम्ही तुमच्यासमोर हे सादर करित आहोत. यासोबत भूमिनं #PednekarKePed हा हॅशटॅग सुद्धा वापरला आहे. जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

काही महिन्यांपूर्वी भूमिनं म्हटलं होतं की तिला घरच्या घरी भाज्या पिकवण्याची इच्छा आहे. तिनं सांगितलं होतं की तिला आईच्या मदतीनं hydroponics फार्मिंगच्या माध्यमातून घरीच शेती करायची आहे. त्यानंतर एक महिन्यानं भूमिनं शेअर केलेल्या या फोटोंनी सर्वांची मनं जिंकली आहेत. याशिवाय तिनं घरीच पिकवलेल्या टोमॅटोंचे फोटो सुद्धा इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. भूमिच्या चाहत्यांनी तिच्या या कामाचं कौतुक केलं आहे.

वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर भूमि लवकरच करण जौहरचा बहुचर्चित सिनेमा तख्तमध्ये दिसणार आहे. याआधी ती आयुष्यमान खुरानासोबत 'बाला', कार्तिक आर्यनसोबत 'पती पत्नी और वो' आणि तापसी पन्नूसोबत 'सांड की आँख' या सिनेमात दिसली होती. तिच्या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती आणि यातील तिच्या कामाचं कौतुक सुद्धा झालं होतं.

(संपादन- मेघा जेठे.)

First published: April 26, 2020, 11:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading