Home /News /entertainment /

Lock Upp: 'मी कधीच आई बनू शकत नाही...' अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

Lock Upp: 'मी कधीच आई बनू शकत नाही...' अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

सध्या एकता कपूरचा (Ekta Kapoor) 'लॉक अप' (Lock Upp) प्रचंड चर्चेत आहे. सतत वादविवाद, भांडणे, राडे पाहायला मिळतात. तसेच शोमध्ये अनेक शॉकिंग खुलासे होत असतात. त्

  मुंबई, 28 एप्रिल-  सध्या एकता कपूरचा (Ekta Kapoor) 'लॉक अप' (Lock Upp) प्रचंड चर्चेत आहे. सतत वादविवाद, भांडणे, राडे पाहायला मिळतात. तसेच शोमध्ये अनेक शॉकिंग खुलासे होत असतात. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढते. या शोमुळे स्पर्धकांनासुद्धा प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.दरम्यान शोमध्ये अभिनेत्री पायल रोहतगीने  (Payal Rohatgi)  एक धक्कादायक खुलासा केला आहे. जे ऐकल्यानंतर चाहते भावुक झाले आहेत. पायलने कॅमेऱ्यासमोर बोलताना सांगितले की, ती कधीही आई बनू शकत नाही. अभिनेत्रीने खुलासा केला की तिने IVF देखील केला आहे, परंतु ते देखील अपयशी ठरलं. लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असणाऱ्या अभिनेत्री पायल रोहतगीने कॅमेऱ्याच्या माध्यमातून चाहत्यांसोबत आपलं मोठं रहस्य शेअर केलं आहे. अभिनेत्रीने सांगितले की नेमकं काय कारण आहे की ज्यामुळे तिनं आजपर्यंत आपला बॉयफ्रेंड संग्रामशी लग्न केलं नाहीय. यावेळी पायल फारच भावुक झाली होती. पायलने कॅमेऱ्यासमोर रडत रडत खुलासा केला की ती कधीही आई होऊ शकणार नाहीय. पायलने खुलासा केला की संग्राम आणि तिने अनेक वेळा प्रयत्न करुन पण अपयश आलं. ती पुढे म्हणाली की, मला असं वाटलं की, जेव्हा मी गरोदर राहू शकेन तेव्हा आपण लग्न करू. त्यामुळे मला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट राहावं लागेल. अभिनयावर लक्ष केंद्रित करावं लागेल आणि आयुष्यात पुढे जावं लागेल.ती पुढे म्हणाली की, आता संग्रामला हे समजून घ्यावं लागेल आणि मला वाटतं की त्याला हे समजलं आहे की मी कधीच गर्भवती होऊ शकत नाही. मी आयव्हीएफसुद्धा केलं होतं. पण तेही यशस्वी झालं नाही. पायल भावुक होत म्हणाली, 'म्हणूनच कधी कधी मी संग्रामला सांगते की, तू दुस-या कोणाशी तरी लग्न कर, जी तुला तुझं मुल देऊ शकते'.
  View this post on Instagram

  A post shared by ALTBalaji (@altbalaji)

  संग्राम सिंहनुकतंच लॉकअपमध्ये आला होता. यावेळी तो म्हणाला, 'पायल रोहतगी सारख्या स्वतंत्र आणि 'सशक्त' मुलीला गमावण्याची जोखीम तो घेऊ शकत नाही त्याने लॉकमध्ये पायलसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. हे पाहून पायल फारच आनंदी झाली होती. दरम्यान जुलैमध्ये पायलच्या वाढदिवशी लग्न करण्याचा संग्रामचा विचार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, OTT

  पुढील बातम्या