फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार हे चार धमाकेदार सिनेमे, रणवीर सिंगकडून प्रेक्षकांची अपेक्षा

नव्या वर्षाची सुरुवात पॉलिटिकल एजेंडा असलेल्या विषयांच्या सिनेमांनी झाली.

  • Share this:

नव्या वर्षाची सुरुवात पॉलिटिकल एजेंडा असलेल्या विषयांच्या सिनेमांनी झाली. उरी, दी एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर, ठाकरे यांसारखे सिनेमे आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित सिनेमा येत्या काळात येणार असल्याचेही नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कळलं. २०१९ चा फेब्रुवारी महिन्यातही मोठे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

एक लडकी को देखा तो ऐसा लगा- या सिनेमातून पहिल्यांदा अनिल कपूर आणि त्यांची मुलगी सोनम कपूर अहुजा एकत्र काम करणार आहेत. सिनेमाची कथा समलैंगिक नात्यावर आधारित आहे. सिनेमात राजकुमार राव, जुही चावला यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अनेक वर्षांनंतर अनिल आणि जुहीची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सिनेमाचं दिग्दर्शन शैली चोपडा यांनी केलं असून येत्या १ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

फकीर ऑफ वेनिस- आनंद सुरापुर यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमाही १ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. यात फरहान अख्तर, अनु कपूर आमि कमाल सिद्धू यांची मुख्य भूमिका आहे. या सिनेमाला ए. आर. रेहमानने संगीत दिलं आहे. २००९ मध्ये हा सिनेमा पूर्ण करण्यात आला होता. मात्र हा सिनेमा प्रदर्शित व्हायला तब्बल १० वर्ष लागली.

गली बॉय- झोया अख्तरचं दिग्दर्शन असलेला गली बॉय सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात रणवीर सिंगने रॅपरची भूमिका साकारली आहे. सिनेमांची गाणी प्रेक्षकांना आधीच आवडली असून अनेकांना या सिनेमाकडून अपेक्षा आहेत. रणवीर सिंगसोबत या सिनेमात आलिया भट्टही आहे.

टोटल धमाल- इंद्र कुमार यांचं दिग्दर्शन असलेल्या धमाल सिनेमाच्या सीरिजमधील टोटल धमाल सिनेमाही याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे. मल्टिस्टारर सिनेमा म्हणून याकडे पाहिलं जात आहे. अजय देवगन, अनिल कपूर, संजय दत्त, अरशद वारसी, रितेश देशमुख, आशीष जौधरी, जावेद जाफरी, बोमन ईरानी, माधुरी दीक्षित, इशा गुप्ता हे कलाकार सिनेमात दिसतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2019 01:15 PM IST

ताज्या बातम्या