'लिप्स्टिक अंडर माय बुरखा' 28जुलैला रिलीज

'लिप्स्टिक अंडर माय बुरखा' 28जुलैला रिलीज

स्त्रियांच्या प्रश्नांभोवती फिरणाऱ्या या सिनेमात कोंकणा सेन शर्मा ,रत्ना पाठक शहा प्रमुख भूमिकेत आहे तर प्रकाश झा या सिनेमाचे निर्माता आहेत.

  • Share this:

07 जून : प्रदीर्घ लढ्यानंतर 'लिप्स्टिक अंडर माय बुरखा' सिनेमाचा प्रदर्शित होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय.टोकियो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये स्पिरिट आॅफ आशिया पुरस्काराने नावाजलेल्या या चित्रपटाला रिलीज करण्यास सेन्सॉर बोर्डाने नकार  दिला होता.

त्यांच्या मते ह्या  चित्रपटाच्या कथा देशातील काही घटकांना इजा पोचवणारी आहे. तसेच त्यात आॅडियो पोर्नोग्राफी,आक्षेपार्ह शिव्याही काही प्रमाणात आहेत.

या विरूध्द दिग्दर्शक अलंकृता श्रीवास्तव यांनी दाद मागितली होती .शेवटी या चित्रपटाला सेन्सॉर बॉर्डाने ए सर्टिफीकेट दिलंय.

येत्या 28 जुलैपासून तो थिएटरमध्ये झळकणार आहे. स्त्रियांच्या प्रश्नांभोवती फिरणाऱ्या या सिनेमात कोंकणा सेन शर्मा ,रत्ना पाठक शहा प्रमुख भूमिकेत आहे तर प्रकाश झा या सिनेमाचे निर्माता आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2017 02:47 PM IST

ताज्या बातम्या