अखेर 'लिपस्टिक अण्डर माय बुरखा' होणार रिलीज

फिल्म सर्टिफिकेट अपील ट्रिब्युनलनं सेन्साॅर बोर्डाला ए सर्टिफिकिट देऊन सिनेमा रिलीज करा, असे आदेश दिलेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2017 12:41 PM IST

अखेर 'लिपस्टिक अण्डर माय बुरखा' होणार रिलीज

26 एप्रिल : सरते शेवटी खूप संघर्ष करून ' लिपस्टिक अण्डर माय बुरखा' रिलीज होतंय. फिल्म सर्टिफिकेट अपील ट्रिब्युनलनं सेन्साॅर बोर्डाला ए सर्टिफिकिट देऊन सिनेमा रिलीज करा, असे आदेश दिलेत.

ट्रिब्युनलनं म्हटलंय, सिनेमातल्या शिव्या, त्यातली दृश्य हा सिनेमाचा महत्त्वाचा भाग आहे.  काही शब्दांना म्युट करायचे आदेश दिलेत.

प्रकाश झांचा हा सिनेमा सेन्साॅरनं रिलीज करायलाच नकार दिला होता.  सिनेमाच स्त्रियांना फार चुकीच्या पद्धतीनं दाखवलंय, ठराविक वर्गाच्या भावना दुखावतील,असं सेन्साॅरनं म्हटलं होतं.

त्याविरोधात दिग्दर्शक अलंकृता श्रीवास्तव आणि  निर्माता प्रकाश झांनी एफसीएटीमध्ये न्यास मागितला होता.  आता ए सर्टिफिकेटसह हा सिनेमा रिलीज होईल.

कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक शाह, अहाना कुमरा असे ताकदीचे कलाकार सिनेमात आहेत.  अनेक आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सिनेमाचा गौरव झालाय. सिनेमाला स्पिरीट आॅफ एशिया अॅवाॅर्ड आणि आॅक्सफेम अॅवाॅर्डनं गौरवलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 12:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...