बिजिंग, 28 डिसेंबर: गेम डेव्हलपर आणि Yoozoo चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी लिन ची (Lin Qi Dies) यांचं निधन झालं आहे. गेम ऑफ थ्रोन्स (Game of Thrones) या वेब सीरिजमुळे लिन ची यांना खरी ओळख मिळाली. पोलिसांच्या तपासातून हे दिसून आलं आहे की, त्यांच्या चहामध्ये विष मिसळून त्यांची हत्या करण्यात आली आहे. शांघायच्या पोलिसांचा लिन ची यांचे सहकारी Xu यांच्यावर संशय आहे.
लिन ची यांची हत्या संपत्तीमुळे?
हुरुन चायना रिच लिस्टच्या माहितीनुसार, लिन ची यांची एकूण संपत्ती जवळजवळ 6.8 बिलियन युआन म्हणजे भारतीय रुपयांप्रमाणे 76 अरब 60 करोड़ रुपये एवढी होती. त्यांची हत्या नाताळच्याच दिवशी झाली आहे. त्यांच्या शोकसभेसाठी त्यांच्या ऑफिसमधील सगळे सहकारी एकत्र जमले होते. लिन यांची हत्या त्यांच्या संपत्तीमुळे झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत पोलिसांचा अधिक तपास सध्या सुरू आहे.
लिन ची चीनमधील गेमिंग क्षेत्रातल्या सर्वात नावाजलेल्या व्यक्तींपैकी एक होते. सिनेक्षेत्रातून त्यांनी गेमिंगच्या क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. त्यांनी 2009 मध्ये Yoozoo या कंपनीची स्थापना केली आणि अल्पावधितच यशाची अनेक शिखरं गाठली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मोबाईल गेमिंग क्षेत्रात खूप चांगले बदल केले. Yoozoo कंपनीचा विस्तार केवळ चीनपुरताच मर्यादित राहिलेला नाही तर आशिया, युरोप आणि अमेरिकेतही त्यांचा व्यवसाय सुरू आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या गेम ऑफ थ्रोन्स या वेब सीरिजचे ते डेव्हलपर होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.