मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ramya Krishnan: 'तेलुगूमध्ये हिट होते....', पुन्हा बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर काय म्हणाल्या राम्या कृष्णन?

Ramya Krishnan: 'तेलुगूमध्ये हिट होते....', पुन्हा बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर काय म्हणाल्या राम्या कृष्णन?

'बाहुबली'फेम शिवगामी अर्थातच साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री राम्या कृष्णन सध्या आपल्या 'लायगर' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.

'बाहुबली'फेम शिवगामी अर्थातच साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री राम्या कृष्णन सध्या आपल्या 'लायगर' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.

'बाहुबली'फेम शिवगामी अर्थातच साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री राम्या कृष्णन सध्या आपल्या 'लायगर' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 28 ऑगस्ट- 'बाहुबली'फेम शिवगामी अर्थातच साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री राम्या कृष्णन सध्या आपल्या 'लायगर' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातून विजय देवरकोंडाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हवी तशी कमाई करताना दिसून येत नाहीय. या चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे हा चित्रपटदेखील इतर बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे फ्लॉफ जाणार असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान राम्या यांनी आपल्या करिअरबाबत एक खुलासा केला आहे. पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलंय.

अभिनेत्री राम्या कृष्णन यांनी 1983 मध्ये 'वेल्लई तमसु' या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. राम्या यांनी आपल्या तब्बल चार दशकांच्या कारकिर्दीत तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत राम्या कृष्णन यांनी 'दयावान', 'परंपरा', 'खलनायक', 'चाहत', 'बनारसी बाबू' आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, यापैकी एकाही चित्रपटानं इथे चांगली कामगिरी केलेली नाहीय. आणि याठिकाणी तिच्या अभिनयाला ती खास ओळख मिळाली नाही. सोबतच त्यांनी म्हटलं, 'मी साऊथमध्ये आधीपासूनच मुख्य अभिनेत्री किंवा एक यशस्वी अभिनेत्री होते. त्यामुळे बॉलिवूडमध्ये येऊन संघर्ष करण्याची माझ्यात ताकत नव्हती'.

(हे वाचा:सुनील शेट्टीनं Boycott Bollywood वर केलं भाष्य; सांगितलं चित्रपट न चालण्यामागचं कारण )

राम्या या सध्या 51 वर्षाच्या आहेत. आजही त्या आपली प्रत्येक भूमिका अगदी चोखपणे पार पाडतात. राम्या यांनी बोलताना पुढे म्हटलं, 'मी दक्षिणेतील चित्रपट निर्मात्यांची आभारी आहे ज्यांनी मला चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण काम दिलं. मला आनंद आहे की मला कमल हसनच्या 'पंचंतथिरम' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ज्यात मी मॅगी या कॉल गर्लची भूमिका केली होती. लायगर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत असला तर राम्या यांच्या भूमिकेची प्रशंसा केली जात आहे. या चित्रपटात त्यांनी विजय देवरकोंडाच्या आईची भूमिका साकारली आहे.पुढील कामाबाबत सांगायचं झालं तर, राम्या लवकरच रजनीकांत यांच्या 'जेलर' या चित्रपटात दिसणार आहेत. यामध्ये त्या एक डॉक्टरची भूमिका साकारत आहेत.

First published:

Tags: Entertainment, South actress