सोनू निगमच्या जीवाला धोका; पोलीस सुरक्षा वाढवली

सोनू निगमच्या जीवाला धोका; पोलीस सुरक्षा वाढवली

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याची पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

  • Share this:

05 फेब्रुवारी : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याची पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काही कट्टरवादी संस्थांनी सोनू निगमची हत्या करण्याचा कट रचला आहे. अशी माहिती महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागाने पोलिसांना दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणेकडून असं सांगण्यात आलं आहे की, या कट्टरवादी संस्था कोणत्याही पल्बिक प्लेसमध्ये किंवा कार्यक्रमात सोनू निगमवर निशाना साधू शकतात. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून सोनू निगमच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

बॉलिवूडचा हा प्रसिद्ध गायक मागच्या वर्षापासून सकाळी होणाऱ्या अजानवर आवाज उठवत आहे. सकाळी होणाऱ्या अजानवर त्याने अनेक कार्यक्रमात भाष्य केलं आहे. यामुळे काही मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यात काही कट्टरवादी संघटना सोनू निगमला धमक्या देत आहे.

त्याच बरोबर सोनू निगमचं गाजलेलं आणि वादग्रस्त वाक्य म्हणजे, 'मी पाकिस्तानमध्येही राष्ट्रगीताचा मान राखेन' सिनेमागृहात राष्ट्रगीत बाजवण्यावरच्या वादावर सोनूने हे भाष्य केलं होतं. त्याच्या या वाक्यामुळे अनेक कट्टरवादी संस्था त्याच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सोनू निगमच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 5, 2018 12:42 PM IST

ताज्या बातम्या