मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘फुलला सुंगध मातीचा’ वादाच्या भोवऱ्यात; त्या दृश्यामुळं दुखावल्या LGBTच्या भावना

‘फुलला सुंगध मातीचा’ वादाच्या भोवऱ्यात; त्या दृश्यामुळं दुखावल्या LGBTच्या भावना

LGBT समुदायानं फुलला सुंगध मातीचा विरोधात केली तक्रार; मालिकेद्वारे केला जातोय अपमान

LGBT समुदायानं फुलला सुंगध मातीचा विरोधात केली तक्रार; मालिकेद्वारे केला जातोय अपमान

LGBT समुदायानं फुलला सुंगध मातीचा विरोधात केली तक्रार; मालिकेद्वारे केला जातोय अपमान

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 8 जून: फुलला सुंगध मातीचा (Phulala Sugandha Maticha) ही मराठी मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या मालिकेत दाखवल्या जाणाऱ्या काही दृश्यांविरोधात LGBT कम्युनिटीनं तक्रार दाखल केली आहे. या दृश्यांमुळं त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. (LGBT File Complaint) या मालिकेद्वारे त्यांचा अपमान केला जातोय असा आरोप करत त्यांनी कायदेशीररित्या तक्रार दाखल केली आहे.

प्रकरण नेमकं आहे तरी काय?

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेत अभिनेता हर्षद अतकरी शुभम ही मुख्य व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. कथानकानुसार त्यानं एका पाककला स्पर्धेत भाग घेतला. याच स्पर्धेत सँडी नावाचा एक स्पर्धक देखील आहे. हा सँडी समलैंगिक आहे. या सँडीची त्यांच्या लैंगिकतेवरुन मालिकेत खिल्ली उडवली गेली असा आरोप केला जात आहे. स्पर्धा सुरु असताना सँडी आणि शुभमची आई म्हणजेच जीजी अक्का यांच्यामध्ये झालेल्या संवादावरुन LGBTQIA+ कम्युनिटीने आक्षेप घेतला आहे.

'आमचं घर आहे संकटात', प्राजक्ता माळीनं चाहत्यांना केली मदतीची विनंती

गरजूंच्या मदतीसाठी पुढे आली सनी लियोनी; 1 लाख लोकांना केलं अन्नदान

सँडीसोबत झालेल्या संवादात शुभमची आई त्याला त्याच्या बांगड्या, ज्वेलरी आणि इतरत्र मेकअपचे साहित्य बहिणीला द्यायला सांगते. सँडी आणि जीजी अक्का यांच्यामध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. शिवाय त्यांनी या विरोधात कायदेशीर तक्रार देखील दाखल केली आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ‘फुलाला सुगंध मातीचा’ही सुपरहिट हिंदी मालिका ‘दिया और बाती हम’चा रिमेक आहे.

First published:

Tags: Colors marathi, Entertainment, Tv actor, TV serials