S M L

लाडकी लेक मीराच्या आयुष्यात आणखी एक ट्विस्ट

स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’मध्ये आलंय नवं वळण. मीराचं आयुष्य उध्वस्त करणाऱ्या ऋषीला काही दिवसांपूर्वीच त्याच्या पापाची शिक्षा मिळाली.

Updated On: Sep 4, 2018 06:18 PM IST

लाडकी लेक मीराच्या आयुष्यात आणखी एक ट्विस्ट

मुंबई, 4 सप्टेंबर : स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’मध्ये आलंय नवं वळण. मीराचं आयुष्य उध्वस्त करणाऱ्या ऋषीला काही दिवसांपूर्वीच त्याच्या पापाची शिक्षा मिळाली. ऋषीच्या मृत्यूनंतर मीराने नव्याने आयुष्याला सुरुवात केली. तिच्या या कठीण काळात तिला विजयने साथ दिली. पण मीराच्या आयुष्यातला संघर्ष थांबायचं काही नाव घेत नाहीय.

मीराला निस्वार्थपणे मदत करणाऱ्या विजयसोबत तिचं नेमकं काय नातं आहे? विजयने तिला का मदत केली? असे अनेक प्रश्न जवळच्याच माणसांकडून तिला विचारण्यात येत आहेत. विजय आणि मीराच्या नात्यावर शंका घेण्यात आल्यामुळेच अखेर मंदिरातच विजयने मीरासोबत लग्न घेण्याचा निर्णय घेतलाय.

या लग्नामुळे हा गुंता सुटेल असं वाटत असतानाच मालिकेत पुन्हा ऋषीची एण्ट्री होणार आहे. ऋषीच्या परत येण्याने मीराच्या आयुष्यातला तणाव पुन्हा वाढणार का? ती या परिस्थितीचा सामना कसा करणार? ऋषीचा पुढचा डाव नेमका काय असणार? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं लेक माझी लाडकीच्या पुढील भागांमध्ये मिळणार आहेत.

दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ही मालिका टीव्हीवर  सुरू आहे. अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, नक्षत्रा मेढेकर, सायली देवधर यांच्या भूमिका आहेत. आतापर्यंत ऋषीनं मीराला खूपच छळलं. कधी एका पायावर उभं राहायची शिक्षा दिली, तर कधी गरम तवा हातात दिला. पण मीरा काही त्याला सोडायला तयार झाली नाही.

तिच्या घरच्यांनीही तिला अनेकदा समजावलं असतं. मग मधे बऱ्याच घटना घडल्या. शेवटी निसर्गानंच ऋषीला मीरापासून दूर केलं. ऋषी हे जग सोडून निघून गेला, पण खरंच तो गेला की तीही एक फसवणूक होती. याचीच उत्तरं आपल्याला आता मिळणार आहेत.

Loading...
Loading...

VIDEO : दहीहंडीचे बक्षिस वितरण सुरू असताना कोसळला स्टेज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2018 06:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close