Home /News /entertainment /

एकेकाळी खोटं मेडिकल सर्टिफिकेट देऊन अशोक मामा घ्यायचे सुट्ट्या, KBCच्या मंचावर UNTOLD किस्स्यांची मेजवानी

एकेकाळी खोटं मेडिकल सर्टिफिकेट देऊन अशोक मामा घ्यायचे सुट्ट्या, KBCच्या मंचावर UNTOLD किस्स्यांची मेजवानी

एकेकाळी खोटं मेडिकल सर्टिफिकेट देऊन अशोक मामा घ्यायचे सुट्ट्या, KBCच्या मंचावर UNTOLD किस्स्यांची मेजवानी

एकेकाळी खोटं मेडिकल सर्टिफिकेट देऊन अशोक मामा घ्यायचे सुट्ट्या, KBCच्या मंचावर UNTOLD किस्स्यांची मेजवानी

सिनेसृष्टीतल्या त्यांच्या कारकिर्दीमधल्या वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवणारे सर्वांचे लाडके अभिनेता अशोक सराफ कोण होणार करोडपतीच्या मंचावर हजेरी लावणार आहेत.

    मुंबई, 22 जून:  काही मोजक्या पण चतुरस्त्र अभिनयाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे सर्वांचे लाडके मामा म्हणजेच अभिनेते अशोक सराफ ( Ashok Saraf) मामांनी नुकतीच वयाची पंच्चाहत्तरी ( Ashok Safar 75th Birthday) पूर्ण केली तर  मराठी सिनेसृष्टीत त्यांना 50 वर्ष पूर्ण झालीत.  सिनेसृष्टीतल्या त्यांच्या कारकिर्दीमधल्या वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवल्या आहेत. अशोक मामा येत्या शनिवारी 'कोण होणार करोडपती'च्या (kon honaar crorepati)  मंचावर हजेरी लावणार आहेत. अशोक सराफ यांचा 'ययाती' ( Yayati) पासून सुरू झालेला नाट्यसृष्टीतला प्रवास आत्ताच्या 'व्हॅक्युम क्लिनर' ( Vacuum Cleaner) पर्यंत अविरतपणे सुरू आहे. या प्रवासातील काही अनटोल्ड किस्से अशोक मामा कोण होणार मराठी करोडपतीच्या मंचावर उलगडणार आहेत.  कोण होणार करोडपतीच्या 25 जूनच्या भागात मामांच्या किस्स्यांची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सिनेनाट्यसृष्टीतल्याअनेक आठवणींना उजाळा देण्यात आला.  मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अशोक मामा बँकेत नोकरी करायचे आणि एकीकडे नाटकाचे दौरे करायचे. त्या वेळी खोटं मेडिकल सर्टिफिकेट देऊन बँकेत घेतलेल्या सुट्ट्यांचे मजेदार किस्से मामा आणि त्यांचे बंधू यांनी या वेळी सांगितले. लहानपणी प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याबरोबर नाटकात काम  केल्याच्या आणि त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळल्याच्या आठवणीही  मामांनी सांगितल्या. 'ययाती आणि देवयानी' ह्या नाटकातून त्यांनी रंगमंचावर पदार्पण केलं, 'प्रेमा तुझा रंग कसा' या नाटकातला पँटची नाडी सुटल्याचा गमतीशीर किस्सा, 'भस्म' सिनेमातल्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, संगीताची आवड; अशा अनेक आठवणी आणि किस्से यांमुळे 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग  अधिकच रंगतदार होणार आहे. हेही वाचा - घरच्यांच्या विरोधात जाऊन दीपू देणार इंद्राची साथ! काय घडणार मालिकेच्या येत्या भागात? अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ आणि पत्नी निवेदिता सराफ यांच्या भगिनी डॉ. मिनल परांजपे हेही सहभागी होणार आहेत.   पंढरपूरजवळील एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणार्या आणि त्यांना आधार देणार्या  प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित 'पालवी' या सेवाभावी संस्थेसाठी अशोक सराफ 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. दोन आठवड्यांपूर्वी  सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' च्या मराठीतील नव्या पर्वाला सुरुवात झाली.  पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि काजोल विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर दुसऱ्या आठवड्यात ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका पद्मश्री सुधा मूर्ती उपस्थित होत्या. आता तिसऱ्या आठवड्यात अभिनेते अशोक सराफ त्यांच्या उपस्थितीने धम्माल उडवणार आहेत.
    Published by:Minal Gurav
    First published:

    Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Tv actor, Tv actress, Tv celebrities, TV serials, Tv shows

    पुढील बातम्या