मुंबई, 27 जुलै : संजय दत्तच्या बायोपिक 'संजू'बद्दल एकानं हरकत घेतलीय. ती व्यक्ती कोण ठाऊकेय? अबू सालेम. हो तुरुंगात राहून त्यानं संजूच्या निर्मात्यांना नोटिस पाठवलीय. सालेमनं म्हटलंय, सिनेमात जे काही दाखवलं. ते चुकीचं आहे. राजकुमार हिरानी आणि विधू विनोद चोप्रा यांना 15 दिवसात नोटिस द्यायचीय. 15 दिवसांत जर त्यांनी काही उत्तर दिलं नाही तर अबू सालेमचा वकील मानहानीचा दावा दाखल करणार आहे.
अबू सलेमच्या म्हणण्याप्रमाणे सिनेमात रणबीर कपूर म्हणतो, हत्यार पुरवठा सालेमच्या माणसांनी केला होता. हे चुकीचं आहे. सालेमच्या मते त्यांचा कोणीच माणूस हत्यार पुरवठा करण्यात नव्हता.
बाॅक्स आॅफिसवर संजूनं बक्कळ कमाई केली होती. रणबीर कपूरच्या 'संजू'ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एंट्री केलीय. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार बाहुबली सिनेमासारखा दुसरा कुठलाही सिनेमा बॉक्सऑफीसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करू शकणार नाही. पण संजू सिनेमाने तिसऱ्याच दिवशी हे भाकित खोटे ठरवले . आता संजू 200 कोटींच्या क्लबमध्ये समील झालाय. संजू सिनेमा या वर्षीचा सर्वात मोठा ओपनर सिनेमा बनला आहे. पहिल्या सात दिवसांतच 'संजू'नं अामिर खानचा '3इडिअट्स' आणि 'दंगल'चे रेकॉर्ड तोडले आहेत.
सहाव्या दिवसापर्यंत संजूने एकूण 186.41 करोडची कमाई केली होती तर सातव्या दिवशी हा सिनेमा 200 करोडच्या क्लबच्या यादीत आलाय. आणि विशेष म्हणजे हा सिनेमा कुठल्याही खास सण, सुट्टीच्या दिवशी रिलीज झाला नव्हता.
संजय दत्तनं भूमिका केलेल्या सिनेमांनीही इतकी मजल मारली नव्हती. या सिनेमावर उलटसुलट बरीच चर्चा झाली. गुन्हेगारावर सिनेमा करावा का इथपासून राजकुमार हिरानीची संजय दत्तबरोबरची मैत्री इथपर्यंत बरीच चर्चा झडली. पण आपलं आयुष्य पडद्यावर दाखवायला संजूबाबानं काही फक्त मैत्रीखातर परवानगी दिली नाही. त्यासाठी त्यानं घेतले ९ ते १० कोटी.