Home /News /entertainment /

Laxmii बार ठरला फुसका; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

Laxmii बार ठरला फुसका; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कियारा अडवाणीच्या (Kiara Advani) लक्ष्मी (Laxmii) सिनेमावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. सिनेमात फारच थोड्या काळासाठी दिसलेला शरद केळकर (Shrad Kelkar)पडद्यावर भाव खाऊन जातो.

    मुंबई, 10 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कियारा अडवाणीचा (kiara Advani) नवा सिनेमा लक्ष्मी (Laxmii) समीक्षक आणि प्रेक्षकांना फारसं खूश करू शकलेला नाही. कलाकांचा अभिनय चांगला झाला आहे. पण चित्रपटाचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी गडबड झाली आहे. ‘कंचना’ या तामिळ सिनेमावर आधारलेला लक्ष्मी प्रेक्षकांची घोर निराशा करतो. ज्या लोकांनी कंचना हा सिनेमा बघितला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुळ सिनेमा हा लक्ष्मीपेक्षा चांगला होता. प्रदर्शनाच्या आधीपासूनच हा चित्रपट वादामध्ये सापडला होता. सोशल मीडियावर सध्या लक्ष्मी सिनेमावर मीम्सचा धुमाकूळ सुरू आहे. एका युझरने मिर्झापूर 2चा एक सीन शेअर करत म्हटलं आहे, ‘अक्षय कुमारचा लक्ष्मी सिनेमा पाहून झाल्यावर लोकं म्हणतात आम्हाला तुमच्याकडून जास्त अपेक्षा होत्या.’ एका युझरने चक्क आयुष्मान खुराना, विक्की कौशल, शाहिद कपूर, वरुण धवन आणि टाइगर श्रॉफ हे अक्षय कुमारला उचलून नेत आहेत असं दाखवलं आहे. एका युझरने डोळ्यात चक्क टॉयलेट क्लिनर घातलाचा फोटो शेअर करत लक्ष्मी बघितल्यावर असं कॅप्शन दिलं आहे. सिनेमातलं अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांची जोडीही साजेशी वाटत नाही. त्याच्या वयातली तफावत दिसून येते. शरद केळकरने साकारलेल्या भूमिकेबद्दल मात्र प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिक्रिया आहेत. थोडा वेळच दिसलेला शरद केळकर पडद्यावर भाव खाऊन जातो.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Akshay Kumar

    पुढील बातम्या