मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सलमान खानला मारण्यासाठी पूर्ण तयार होता Plan, घरापर्यंत असे पोहोचले शूटर

सलमान खानला मारण्यासाठी पूर्ण तयार होता Plan, घरापर्यंत असे पोहोचले शूटर

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : सिद्धू मूसेवालानंतर बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान शूटर्सच्या निशाण्यावर होता. शूटर्स त्याच्या फार्महाऊसवरही पोहोचले होते. एवढच नाही तर दोन वेळा हल्ला करून त्यामधून सलमान खान वाचल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

सिद्धू मूसेवालाला मारण्यापूर्वी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सुपरस्टार सलमान खानला मारण्यासाठी प्लॅन बी तयार केला होता. पोलिसांच्या तपासात या प्लॅन बीचा खुलासा झाला आहे. या संपूर्ण प्लॅनची जबाबदारी गोल्डी बराड आणि लॉरेन्सच्या गँगमधील खास शूटर कपिल पंडितकडे होती.

" isDesktop="true" id="761058" >

पनवेलमध्ये असलेल्या फार्महाऊसवर त्याला मारण्याचा प्लॅन तयार करण्यात आला होता. याच फार्म हाऊसला जाण्याच्या मार्गावर लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरने एक खोली भाड्याने घेतली होती.

जवळपास दीड महिना ते तिथे राहिले होते. लॉरेन्सच्या या सर्व शूटर्सकडे त्या खोलीत सलमान खानवर हल्ला करण्यासाठी वापरलेली छोटी पिस्तूल, काडतुसे इत्यादी हत्यारं देखील असल्याचं समोर आलं आहे.

First published:
top videos