Home /News /entertainment /

Bharti Singh Birthday: लोक म्हणायचे हिचं लग्न होणार नाही; नातेवाईकांनी तर वाळीत टाकलं, भारतीची भावूक कहाणी

Bharti Singh Birthday: लोक म्हणायचे हिचं लग्न होणार नाही; नातेवाईकांनी तर वाळीत टाकलं, भारतीची भावूक कहाणी

लाफ्टरक्विन भारती सिंह आज तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. सगळ्यांचं मनोरंजन करणारी भारतीची कहाणी फार संघर्षमय होती. भारतीनं अनेक रिअँलिटी शो दरम्यान तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

  मुंबई, 03 जुलै: लाफ्टर क्विन भारती सिंह (laughter queen bharti singh)  आज संपूर्ण देशातील लोकांचं मनोरंजन करत आहे. 2008मध्ये शोबिज की दुनिया या कार्यक्रमातून भारती सिंहने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. भारती आज एका मुलाची आई झाली आहे. बॉलिवूडची पहिली विनोदी अभिनेत्री म्हणून आज भारतीची ओळख आहे. आज 3 जुलै रोजी भारती तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे ( bharti singh birthday )   पंजाबच्या अमृतसर येथे भारतीचा जन्म झाला. आज संपूर्ण देशाला हसवणाऱ्या भारतीचं आयुष्य अनेक संघर्षमय गोष्टींनी भरलं आहे.  बालपणीचं वडिलांचं छत्र हरवल्यानं भारतीला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबालात मोठ्या हालाकीच्या परिस्थितीत दिवस काढावे लागले.  भारतीनं अनेक रिअँलिटी शो दरम्यान तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. भारती सिंहनं राजीव खंडेलवालच्या चॅट शोमध्ये सांगितलं होतं की, ती दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं.  वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण घराची जबाबदारी भारतीच्या आईवर आली. भारती 2 वर्षाची असताना तिची आई केवळ 22 वर्षांची होती. लहानपणी लग्न झाल्यानं तिच्या आईला फार कष्ट सहन करावे लागले होते. भारतीची आई दुसऱ्यांच्या घरी घरकाम करायला जायची. भारतीही अनेकदा आईबरोबर काम करायला जात असतं.  आज अनेकांसाठी आदर्श असणारी भारती आज ज्या ठिकाणी आहे त्यासाठी तिनं अनेक संटकांचा सामाना केला आहे. हेही वाचा - Aaditi Pohankar Exclusive: बॉलिवूडमध्ये नाव कमावणाऱ्या आदितीला मराठीत 'या' दिग्दर्शकाबरोबर करायचंय काम
  वडिलांच्या निधनानंतर भारतीच्या परिवारावर कर्जाचा डोंगर होता. आर्थिक परिस्थिती फारचं बिकट होती. सावकार पैशांसाठी आईला त्रास द्यायला. एकदा त्यांनी आईला शिव्या देखील दिल्या होत्या, असं भारतीनं सांगितलं होतं. नातेवाईकांनी टाकलं होतं वाळीत इंडियाज बेस्ट डान्सर या शोमध्ये भारतीनं सांगितंल होतं की, रिअँलिटी शोसाठी माझी निवड झाली आणि मी मुंबईला येण्याची तयारी करत होते. तेव्हा नातेवाईकांनी मला वाळीत टाकलं होतं.  'हिचे वडिल नाही ही काय काम करणार?' असं म्हणून माझी खिल्ली उडवली होती. 'तिचं तर लग्नही होणार नाही, मुंबईला जाणाऱ्या मुलींच काय होतं हे सर्वांनाच माहिती आहे', असंही म्हटलं गेलं. इतक्या गोष्टींचा सामना केल्यानंतर भारती तिच्या करिअरच्या पिक पॉईंटला येऊन पोहोचली आहे. नुकतीच आई झालेली भारती अनेक अभिनेत्री आणि स्त्रियांसाठी आदर्श बनली आहे. नवव्या महिन्यापर्यंत काम करणाऱ्या भारतीचं आजही प्रचंड कौतुक होतंय. बाळ आणि काम असं दोन्ही मॅनेज करुन भारती आज प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतेय.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News

  पुढील बातम्या