Home /News /entertainment /

‘द फॅमिली मॅन 2’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात, पाहा काय आहे नेमकं प्रकरण

‘द फॅमिली मॅन 2’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात, पाहा काय आहे नेमकं प्रकरण

‘द फॅमिली मॅन 2’ नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

    मुंबई, 26 मे :  ‘फॅमिली मॅन’ च्या (Family Man) उत्तुंग यशानंतर शोचे निर्माते ‘द फॅमिली मॅन 2’ (The Family Man 2) घेऊन येत आहेत. चाहत्यांना याची मोठी उत्सुकता होती. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. एकीकडे चाहत्यांना हा ट्रेलर खुपचं पसंत पडत आहे. तर दुसरीकडे त्यावर वाद सुद्धा निर्माण झाले आहेत. त्यामुळे रिलीजच्या आधीच ही वेबसिरीज कायदेशीर कचाट्यात सापडली आहे. ‘द फॅमिली मॅन 2’ चा ट्रेलर रिलीज होताच, ही वेबसिरीज वादात अडकली आहे. राज्यसभेच्या वाईको सदस्यानी सूचना आणि  प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिलं आहे आणि या पत्रात ‘द फॅमिली मॅन 2’ या वेबसिरीजवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, 'तमिळ एलम योद्धांच्या त्यागाला’ यामध्ये चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आलं आहे. त्यांना आतंकवादाचं स्वरूप देण्यात आलं आहे. तमिळ अभिनेत्री समंथा अक्खीनेनीला पाकिस्तानशी संबंधित असणारी आतंकवादी दाखविण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व तामिळीयन संस्कृती आणि सर्व तमिळ लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तमिळ लोकांनी या वेबसिरीजच्या विरुद्ध आवाज उठवला आहे. (हे वाचा: शेफाली जरीवालाचा स्विमिंग पूलमधील हॉट अंदाज, PHOTO पाहून चाहते म्हणाले हाय गर्मी) त्यांचं म्हणणं आहे, की ही वेबसिरीज तमिळ लोकांविरुद्ध एक चुकीचा संदेश पसरवत आहे. वाईको यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे, की या सिरीजमध्ये तमिळ लोकांना एक आतंकवादी आणि IAS एजंट म्हणून दाखविण्यात आलं आहे. ज्यांचा पाकिस्तानशी संबंध आहे. या वेबसिरीज मधून दाक्षिणात्य सुपरस्टार समंथा अक्खीनेनी हिंदीमध्ये डेब्यू करत आहे. (हे वाचा:VIDEO:‘येऊ कशी तशी मी नांदायला’मध्ये स्वीटू ओमला लंडनला जाण्यापासून थांबवणार का?  ) द फॅमिली मॅन 2’ ही एक ऍक्शन ड्रामा वेबसिरीज आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांतील श्रीकांत या व्यक्तीची ही कथा आहे. तो राष्ट्रीय तपास एजन्सीमध्ये काम करत असतो.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Web series

    पुढील बातम्या