सट्टेबाजीवरून अरबाज-मलाईकात व्हायची भांडणं अखेर झाला काडीमोड

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 2, 2018 07:53 PM IST

सट्टेबाजीवरून अरबाज-मलाईकात व्हायची भांडणं अखेर झाला काडीमोड

मुंबई, 02 जून : बाॅलिवूडचा दबंग खान सलमान खानचा मोठा भाऊ अरबाज खान सट्टा प्रकरणात अडचणीत सापडलाय. त्याने सट्टा लावल्याची तशी कबुलीही दिली. अरबाजच्या या सट्टाबाजीमुळे मलाईका अरोराने घटस्फोट घेतल्याचंही मान्य केलंय.

अरबाज खान गेल्या सहा वर्षांपासून सट्टा लावत होता. आतापर्यंत कोट्यवधींचं नुकसान झालंय. पण गेल्या आयपीएल 11 व्या हंगामात २ कोटी ७५ लाख रुपये नुकसान झालं होतं असं त्यानं स्पष्ट केलंय.

अरबाजने सहा वेळा सट्टा लावला असल्याचं सांगितलं. सट्टेबाजीमुळे मलाईका आणि अऱबाजमध्ये भांडणं होत होती. त्यामुळे मलाईकाने अरबाजपासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. एवढंच नाहीतर त्याच्या सट्टेबाजीच्या सवयीमुळे त्यांचं कुटुंबही त्याच्यावर नाखूश होतं.

सलमान खान अरबाजवर इतका नाराज होता की सलमान एकदा त्याला मारायला उठला होता. वडील सलीम खान यांनी अरबाजला अनेक वेळा सुधारण्याचा सल्ला दिला. पण अरबाजने कुणाचंही ऐकलं नाही.

खान कुटुंबात अरबाज हे स्पष्ट बोलणारे असं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळेच त्यांनी चौकशीत पोलिसांना स्पष्ट माहिती दिली. अरबाज स्वत:ला पीडित असल्याचं सांगताय. बुकीने आपल्या जीवे मारण्याची धमकी दिली होती असंही त्याने सांगितलं. मात्र, सट्टेबाजी करणे हे बेकायदेशीर आहे त्यामुळे अरबाजवर खटला दाखल होऊ शकतो. जर अरबाज माफीचा साक्षीदार झाला तर त्याला दिलासा मिळू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2018 07:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...