16 मार्च : आमिर खानच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली असून, ऑस्कर विजेता हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'च्या रिमेकमध्ये आमिर झळकणार आहे. 'लाल सिंग चढ्ढा' असं या चित्रपटाचं नाव आहे. बाहुबलीचे दिग्दर्शक राजमौलींच्या आगामी तेलुगू सिनेमात आलिया भट काम करणार आहे. गुरुवारी आलियानं आपला वाढदिवस साजरा केला. या पार्टीला रणबीर कपूर, आलियाच्या मैत्रीणी आणि पालक महेश भट आणि सोनी राजदान उपस्थित होते. प्रियंका चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. आगामी जागतिक महिला परिषदेमध्ये प्रियंका चोप्राची मुलाखत घेतली जाणार आहे.