मुंबई 6 सप्टेंबर : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) 2 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्याच्या निधनाची बातमी अजूनही त्याच्या चाहत्यांना पचवणं कठीण जात आहे. तसेच त्याच्या कुटुंबासाठी आणि निकटवर्तीयांसाठी हा मोठा धक्का आहे. कुटुंबातील एकमेव मुलगा गेल्याने सिद्धार्थच्या आईचं दुःख पाहून त्याच्या चाहत्यांना ही रडू अनावर झाल होतं. 3 सप्टेंबर रोजी मुंबईत त्याच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले. अगदी शोकाकुल वातावरणात त्याने शेवटचा निरोप घेतला. तर आता सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी त्याच्या शोक सभेचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या चाहत्यांना ही यात सहभागी होता येणार आहे.
सिद्धार्थच्या पश्चात त्याची आई आणि दोन बहिणी आहेत. 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ही शोकसभा भरणार आहे. अभिनेता करणवीर बोहराने (Karanveer Bohra) त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वरूनही माहिती दिली. सिद्धार्थच्या लाखो फॅन्ससाठी कुटुंबीयांनी ऑनलाईन देखील ही प्रेयर मीट ठेवली आहे. त्याद्वारे चाहत्यांना यात सहभागी होता येईल. जूमवर फॅन्स यात सहभागी होऊ शकतील. यावेळी विशेष मिडीटेशन आणि प्रार्थना सत्र होईल. ब्रह्म कुमारी योगिनी दीदी यांच्यामार्फत या विशेष सत्राच आयोजन करण्यात आलं आहे. करण ने यासोबतच जूम लिंक देखील दिली आहे.
सिद्धार्थच अचानक जाणं त्याच्या चाहत्यांना, निकटवर्तीयांना पचवणं कठीण झालं आहे. अनेकजण सोशल मीडियावर त्याच्या आठवणी शेअर करत आहेत. त्याच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्याच्या अनेक जवळच्या मित्रांनी त्याच्या घरी हजेरी लावली होती. 2 सप्टेंबरला घरीच सिद्धार्थचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. त्यानंतर कूपर रुग्णालयात त्याला मृत घोषीत करण्यात आलं.
Published by:News Digital
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.