मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ऋषी कपूर यांचा पहिला स्मृतिदिन; रणबीरसह आलियानं वाहिली श्रद्धांजली

ऋषी कपूर यांचा पहिला स्मृतिदिन; रणबीरसह आलियानं वाहिली श्रद्धांजली

Rishi Kapoor first death anniversary :  संपूर्ण कपूर कुटुंब आज त्याच्या मुंबईतील घरी एकत्र आलं होतं. यात नीतू कपूर (Neetu Kapoor) , रणबीर कपूर (Ranbir Kapoor) , रिधिमा कपूर साहनी आणि अभिनेत्री आलिया भट्टनेही (Alia Bhatt) उपस्थिती लावली होती.

पुढे वाचा ...
  • Published by:  News Digital

मुंबई 30 एप्रिल : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor)  यांची आज पहिली पुण्यतिथी. अनेक  बॉलिवूड अभिनेत्यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली (Rishi Kapoor first death anniversary) आहे. यासोबतच त्यांच संपूर्ण कुटुंब आज त्याच्या मुंबईतील घरी एकत्र आलं होतं. यात नीतू कपूर (Neetu Kapoor) , रणबीर कपूर (Ranbir Kapoor) , रिधिमा कपूर साहनी आणि अभिनेत्री आलिया भट्टनेही (Alia Bhatt) उपस्थिती लावली होती.

अभिनेते ऋषी कपूर हे बॉलिवूडचे एक दिग्गज कलाकार होते. त्यांचे जगभरात चाहते आहेत. त्यांच्या पुण्यतीथी निमित्त अनेक क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

4 सप्टेंबर 1952 ला मुंबईत त्यांचा जन्म झाला होता. ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनय श्रेत्रात पदार्पण केलं होतं. व त्यानंतर अनेक चित्रपटात ते नायक म्हणून झळकले. तर अनेक सुपरहीट चित्रपट त्यांनी दिले. मागील काही दिवसांत आजारी असतानाही ते चित्रपटांत काम करत होते. ‘शर्माजी नमकीन’ (Sharmaji Namkeen) हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. तर अजूनही चित्रपट प्रदर्शित झालेला नसून येत्या सप्टेंबर महिन्यात चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

ऋषी यांच्या आठवणीत पत्नी नीतू यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. याशिवाय ऋषी यांची मुलगी रिधिमानेही आपल्या बाबांच्या आठवणीत एक पोस्ट लिहीली आहे.

Video: पाहावं ते अजबच! बॉलिवूड निर्माती पायाने नाही तर डोक्याने चढली कारमध्ये

मागील वर्षी 30 एप्रिल 2020 ला ऋषी यांच मुंबईतील रिलायंन्स हॉस्पिटल मध्ये निधन झालं. अभिनेते ऋषी कपूर हे अनेक दिवसांपासून गंभीर अशा कर्करोगाने ग्रस्त होते त्यांच्यावर अमेरिकेत जवळपास 11 महिने उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली व ते भारतात परतले होते. पण काही दिवसांनंतर पुन्हा त्यांची तब्येत खालावली, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्यांची प्राणज्योत मालवली.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Ranbir kapoor