मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Puneeth Rajkumarची पत्नी आहे एक प्रसिद्ध निर्माती; अशी झाली होती भेट

Puneeth Rajkumarची पत्नी आहे एक प्रसिद्ध निर्माती; अशी झाली होती भेट

कन्नड चित्रपटसृष्टीतील पॉवर स्टार म्हटला जाणारा अभिनेता पुनीत राजकुमारचं आज निधन झालं आहे. आज 29 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना बंगळुरू येथील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,29ऑक्टोबर- कन्नड चित्रपटसृष्टीतील पॉवर स्टार म्हटला जाणारा अभिनेता पुनीत राजकुमारचं(Puneeth Rahkumar) आज निधन झालं आहे. आज 29 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना बंगळुरू येथील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. क्रिकेटर व्यंकटेश प्रसादने ट्विटरवर ट्विट करून त्यांच्या मृत्यूची माहिती दिली होती. या अभिनेत्याने वयाच्या ४६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर राज्यभर सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. या लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीबद्दल (Wife)जाणून घेण्याची सर्वांनाच इच्छा झाली आहे.

अभिनेता पुनीत राजकुमारने १९९९ मध्ये अश्विनी रेवनाथसोबत लग्न केलं होतं. या दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. अश्विनी हीसुद्धा मनोरंजन सृष्टीशी निगडित आहे. ती प्रसिद्ध निर्माती आहे. तिने अनेक कन्नड चित्रपटांची निर्मिती केली आहे. अश्विनी आणि पुनीत यांना दोन मुली आहेत. अनेक वेळा मीडियावर दोन मुली आणि पत्नीसोबत विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेलं पाहण्यात आलं आहे. पुनीतचे वडील राजकुमार हेसुद्धा एक प्रसिद्ध अभिनेता होते. तर त्याची आई ही एक निर्माती आणि डिस्ट्रिब्युटर होती. तर पुनीतला दोन भाऊ आणि दोन बहिणीसुद्धा आहेत.

पुनीत राजकुमारच्या तब्येती संदर्भात सांगायचं तर, आज सकाळी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची बातमी समोर आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना पहिल्यांदा छातीत दुखू लागलं होतं. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. मात्र दुर्दैवाने काही वेळातच त्यांच्या निधनाची आली. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. क्रिकेटर व्यंकटेश यांनी ट्विट करून पुनीत राजकुमारचं निधन झाल्याची माहिती दिली होती. क्रिकेटरने लिहिले की, 'अभिनेता पुनीत राजकुमार राहिले नाहीत, हे कळवताना खूप दुःख होत आहे'.

(हे वाचा:Puneeth Rajkumar Dies: साऊथच्या सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं ... )

अभिनेता पुनीत राजकुमारने एक बालकलार म्हणून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. त्याने जवळजवळ १२ चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम केलं आहे. १९८६ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकारचा राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. त्यांनतर पुनीतने 'अप्पू' या चित्रपटातून एक अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. आकाश (2005), अरसु (2007), मिलन (2007) आणि वंशी (2008)अशी अनेक दमदार चित्रपट त्यांनी केले आहेत. त्यांच्या अशा अकाली जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

First published:

Tags: Entertainment