Elec-widget

...जेव्हा लता मंगेशकरांना दिलं होतं विष

...जेव्हा लता मंगेशकरांना दिलं होतं विष

एक दिवस सकाळी लतादीदी अचानक आजारी पडल्या. त्यांचं पोट दुखायला लागलं. आणि हिरव्या रंगाची उलटी झाली. लता मंगेशकर म्हणाल्या, ' त्यानंतर मी तीन महिने गाऊ शकले नव्हते. '

  • Share this:

28 सप्टेंबर : लता मंगेशकरांचा आज वाढदिवस. त्यांना सगळे जण शुभेच्छा देतायत. पण फार कमी जणांना हे माहीत असेल की लतादीदींवर विषप्रयोग झाला होता. त्यांना विष दिलं गेलं होतं.

ही घटना घडली होती भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात. एक दिवस सकाळी लतादीदी अचानक आजारी पडल्या. त्यांचं पोट दुखायला लागलं. आणि हिरव्या रंगाची उलटी झाली. लता मंगेशकर म्हणाल्या, ' त्यानंतर मी तीन महिने गाऊ शकले नव्हते. '

लतादीदींनी हे सगळं लेखिका पद्मा सचदेवना सांगितलंय. ‘ऐसा कहां से लाऊं’ या पुस्तकात याचा उल्लेख आहे. त्यावेळी लतादीदींना वेदना असह्य झाल्या होत्या. डाॅक्टरांनी त्यांना गुंगीचं इंजेक्शन दिलं होतं. लतादीदींना कमालीचा अशक्तपणा आला होता. मृत्यूशी झुंज देऊनच त्या वाचल्या होत्या. आयुष्यातला सर्वात वाईट काळ होता लतादीदींच्या.

डाॅक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे लतादीदींना स्लो पाॅयझन दिलं गेलं. अर्थात, संशयाची सुई त्यांच्या आचाऱ्यावर गेली. कारण लतादीदी आजारी पडल्यावर तो आचारी न सांगता घर सोडून गेला.

त्यानंतर लतादीदींच्या जेवणाची सर्व जबाबदारी उषा मंगेशकरांनी घेतली. स्वयंपाकघर सांभाळण्याचं काम त्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 07:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...