Happy Birthday Bittu! साक्षात लतादीदींनी Cute Photo शेअर करत दिल्या शुभेच्छा

Happy Birthday Bittu! साक्षात लतादीदींनी Cute Photo शेअर करत दिल्या शुभेच्छा

आयुष्यातील विविध घडामोडींबाबत लतादीदी ट्विट करत आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात. असंच एक ट्विट आज लतादीदींनी केलं आणि त्यावर त्यांच्या चाहत्यांनी हजारो कमेंट्स केल्या आहेत. तर आज निमित्त होतं ‘बिट्टू’च्या वाढदिवसाचं. लतादीदींनी नेमकं काय ट्विट केलं आहे पाहा

  • Share this:

मुंबई, 3  फेब्रुवारी : गानकोकिळा लता मंगेशकर सध्या आपल्या चाहत्यांसमोर जरी येत नसल्या तरीही त्या आपल्या Twitter वर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यांच्या आयुष्यातील विविध घडामोडींबाबत लतादीदी ट्विट करत आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात. असंच एक ट्विट आज लतादीदींनी केलं आणि त्यावर त्यांच्या चाहत्यांनी हजारो कमेंट्स केल्या आहेत. तर आज निमित्त होतं ‘बिट्टू’च्या वाढदिवसाचं. लतादीदींकडे असणाऱ्या कुत्र्याचं नाव बिट्टू असून त्याचा आज पाचवा वाढदिवस आहे.

एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर आपण न चुकता त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा देतो. मात्र आपल्या पाळीव प्राण्यांबाबत मात्र सर्रास विसरून जातो. पण लतादीदींनी त्यांच्या ‘बिट्टू’च्या वाढदिवसाबाबत छान पोस्ट केली आहे. नेहमीप्रमाणे ‘नमस्कार’ अशी ट्विटची सुरुवात करून लतादीदींनी हे ट्विट केलंय.

ट्टिवटरच्या माध्यमातून लतादीदी अनेक विषयांवर भाष्य करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र तरीही आपल्या चाहत्यांसोबत ट्विटरच्या माध्यमातून संवाद साधत असतात.

अन्य बातम्या

नक्कीच रितेशची खैर नाही, लग्नाच्या वाढदिवशी VIDEO शेअर करून बायकोशी घेतला पंगा

'स्वराज्यरक्षक संभाजी' घेणार प्रेक्षकांचा निरोप, अमोल कोल्हेंनी केलं भावुक ट्विट

Valentine Special : अप्सरा पडली प्रेमात, पाहा कोणाला करत आहे डेट

 

First published: February 3, 2020, 5:15 PM IST

ताज्या बातम्या