लता मंगेशकरांना का करावा लागला ट्विटरवरून खुलासा?

लता मंगेशकर यांची प्रकृती खराब असल्याचं सोशल मीडियावर म्हंटलं जात आहे. परंतु आता स्वत: लता दिदिंनी याबाबत सोशल मीडियावर खुलासा केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 14, 2018 01:25 PM IST

लता मंगेशकरांना का करावा लागला ट्विटरवरून खुलासा?

मुंबई, 14 डिसेंबर : गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती नीट नसल्याचं काही दिवसांपासून म्हंटलं जात आहे. त्यांची तब्येत चिंताजनक आहे असंही म्हंटलं जात आहे. यामुळे लता मंगेशकर यांच्या चाहत्यांना फार काळजी वाटू लागली होती. आणि ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली.


लता दिदिंच्या प्रकृती बिघाडाच्या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली. अनेक लोक त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करू लागले होते. पण आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण लता मंगेशकर यांची तब्येत अगदी व्यवस्थित असल्याचं समोर आलं आहे. लता दिदिंनी स्वत:च्या ट्विटरवरून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आता काळजी करण्याचं कारण नाही.

लता मंगेशकर ट्विटरवर म्हणाल्या की, 'नमस्कार माझ्या तब्येतीविषयी काही अफवा पसरत आहेत, पण तुम्ही यावर विश्वास ठेवू नका. मी एकदम व्यवस्थित आहे. आणि आता माझ्या घरी आहे.'

लता दिदिंची तब्येत बरी नाही अशा अफवा सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून पसरत होत्या. म्हणून आता लता दिदिंनी स्वत: याबाबत सोशल मीडियावर खुलासा केला आहे आणि त्यांच्या तब्येतीबाबत येणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही त्यांनी दिलं आहे.

Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2018 01:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...