Home /News /entertainment /

‘ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो’; BKC च्या डीनला लतादीदींनी पाठवलं खास पत्र

‘ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो’; BKC च्या डीनला लतादीदींनी पाठवलं खास पत्र

भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी BKC हॉस्पिटलचे डीन डॉ. राजेश डेरे (Rajesh dere) यांना एक खास पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी त्यांच्या कामाचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.

    मुंबई 7 मे: राज्यातील कोरोना (coronavirus pandemic) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सरकारनं लॉकडाउनचा पर्याय स्विकारुनही कोरोनाची साखळी अद्याप तुटलेली नाही. परिणामी आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमालीचा वाढला आहे. औषधं, लसी, रुग्णालयातील बेड यांची कमतरता जाणवत आहे. मात्र याही परिस्थितीत मुंबईतील बिकेसी जम्बो कोविड सेंटर दिवसरात्र एक करुन कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. दरम्यान त्यांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी BKC हॉस्पिटलचे डीन डॉ. राजेश डेरे (Rajesh dere) यांना एक खास पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी त्यांच्या कामाचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. मुंबई महापालिकेनं हे पत्र आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर करत लतादीदींचे आभार मानले आहेत. “डॉ. श्री राजेश डेरे, सादर प्रणाम ! आपण महाराष्ट्रासाठी, दिवसरात्र काम करत आहात, ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो, अशी मी मंगल कामना करते. घरात सर्वांना नमस्कार! आपली नम्र लता मंगेशकर,” असा संदेश दीदींनी या पत्राद्वारे दिला आहे. या पत्रावर BMCनं “कौतुक करणारे हे शब्द फक्त डीन राजेश डेरे यांच्या कानावर संगीत नाही, तर एमसीजीएमच्या संपूर्ण टीमसाठी देखील आहे. कारण हे पत्र भारतरत्न लता मंगेशकर यांनी लिहिले आहे. लता जी तुमच्या शब्दांनी आमच्यात एक नवीन उर्जा निर्माण झाली आहे,” अशा आशयाची पोस्ट लिहून त्यांचे आभार मानले आहेत. हे पत्र सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. शिल्पा शेट्टीच्या 1 वर्षांच्या मुलीला झाली कोरोनाची लागण अत्यंत अल्पावधीत उभारण्यात आलेल्या या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात तब्बल 2 हजार 208 खाटा (बेड) आहेत. यामध्ये 868 ऑक्सीजन बेड असून 120 अतिदक्षता रुग्णशय्या (ICU Beds) यांचा समावेश आहे. याचबरोबर 67 रुग्णशय्यांना 'व्हेंटिलेटर सपोर्ट' देखील आहे. या व्यतिरिक्त ज्या कोविड बाधित रुग्णांना नियमितपणे डायलिसिसची गरज असते, अशा रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून त्यासाठी 12 रुग्णशैय्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी दिवसाचे 24 तास व आठवड्याचे सातही दिवस यानुसार साधारणपणे 378 डॉक्टर्स, 399 परिचारिका व 513 वैद्यकीय कर्मचारी (वॉर्डबॉय) कार्यरत आहेत. याचबरोबर रुग्णालयाच्या इतर व्यवस्थेसाठी 200 कर्मचारी कार्यरत असून 152 सुरक्षारक्षक देखील सुरक्षेच्या दृष्टीने तैनात आहेत. तसेच या रुग्णालयासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका देखील सदोदित कार्यतत्पर आहेत.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Corona hotspot, Covid-19 positive

    पुढील बातम्या