घरी आल्यानंतर व्हायरल झाला लता दीदींचा 'हा' PHOTO, पाहून वाढेल चिंता

घरी आल्यानंतर व्हायरल झाला लता दीदींचा 'हा' PHOTO, पाहून वाढेल चिंता

या 28 दिवसांच्या उपचारानंतर आता लता दीदींचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटो पाहिल्यानंतर सगळ्यांनीच यावर चिंता व्यक्त केली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar)तब्बल 28 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर रविवारी घरी परतल्या. या 28 दिवसांच्या उपचारानंतर आता लता दीदींचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटो पाहिल्यानंतर सगळ्यांनीच यावर चिंता व्यक्त केली आहे. या फोटोमध्ये लता दीदी 90वर्षीय गायिका लता मंगेशकर व्हीलचेयरवर बसलेल्या दिसत आहे. त्यांनी अंगावर पांढरी शॉल घेतली आहे. तर त्यांचा चेहरा बर्‍यापैकी सुकलेला दिसत आहे.  या फोटोमध्ये त्यांच्यासह तीन परिचारिकादेखील आहेत.

या फोटोमध्ये दिसणाऱ्या परिचारिकांनी रूग्णालयात असताना लता दीदींची काळजी घेतली. व्हायरल भयानी या ऑफिशिअल अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. आणि कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ब्रीच कँडी रुग्णालयाच्या परिचारिका, ज्यांनी तब्बल 28 दिवस लता मंगशेकर यांची काळजी घेतली.

इतर बातम्या - फाशी देण्यासाठी असते फक्त सकाळची वेळ, जल्लाद शेवटी कैद्याच्या कानात म्हणतो...!

 

View this post on Instagram

 

#latamangeshkar is back home hale and hearty❣️ LATA JI WE LOVE YOU #song #lagjagale #movie #singer #alkayagnik latamangeshkar OLD IS GOLD #cinema #film #music #artist #beautiful #bollywoodsong #bollywood #oldsongs #love #india #indiancinema #indianmusic #ashabhosle #kishorekumar #mohdrafi #meenakumari #rajkapoor #ganga #salmankhan #pakistan #sridevi #sairabanu

A post shared by ( ) (@the_latamangeshkarji) on

गेली अनेक दशकं दीदींच्या आवाजामुळे अनेक पिढ्यांचं आयुष्य समृद्ध झालं. त्यामुळे लता दीदी लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून देशभर प्रार्थना करण्यात येत होती. 90 वर्षांच्या दीदींवर मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपाचर सुरू होते. दीदींची प्रकृती आता पूर्ण ठणठणीत झाली असून घरी आल्यानंतर त्यांनी अतिशय भावुक ट्विट करत सगळ्यांचे आभार मानले आहेत. दीदी हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्यासाठी जगभरातून प्रार्थना करण्यात येत होती. चाहत्यांनी दीदींसाठी देवाला साकडंही घातलं. त्या सगळ्यांचे दीदींनी आभार मानले.

इतर बातम्या - तिहार जेलमध्ये निर्भयाच्या हत्यारांना फाशी देण्यासाठी ट्रायल झालं, कारण...!

दीदी म्हणाल्या, गेल्या 28 दिवसांपासून माझ्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मला न्यूमोनिया झाला होता. पूर्ण बरी झाल्यानंतरच घरी जावं असं डॉक्टरांनी सांगितं होतं. आज मी घरी आलेय. देवांचे, माई आणि बाबांचे आशीर्वाद, तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा, तुम्हा सगळ्यांचं प्रेम यामुळेच मी बरी झाले. तुम्हा सगळ्यांचे आभार. ब्रीच कँडीमधले उपचार करणारे डॉक्टर हे देवासारखे धावून आलेत. इथला कर्मचारी वर्ग अतिशय चांगला आहे. त्या सगळ्यांचेही आभार. तुमचं प्रेम असचं राहू द्या असं ट्विटमध्ये दीदींनी म्हटलं होतं.

BREAKING: आज पहाटे ठाणे हादरलं, कचऱ्यात सापडले नवजात अर्भक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2019 01:18 PM IST

ताज्या बातम्या