Home /News /entertainment /

Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधार, परंतु....

Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधार, परंतु....

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना आठवडाभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोना आणि न्युमोनियाची लागण झाल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    मुंबई, 18 जानेवारी-   भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर   (Lata Mangeshkar)  यांना आठवडाभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोना आणि न्युमोनियाची लागण झाल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोशल मीडियावर सतत त्या लवकर ठीक व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली जात आहे. दरम्यान त्यांची हेल्थ अपडेट समोर आली आहे. लता मंगेशकर यांच्या हेल्थबाबतची मोठी अपडेट महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेली आहे. याबाबत त्यांनी सांगितलं, 'लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत पहिल्यापेक्षा सुधारणा झाल्याचं समोर आलं आहे. दीदींची प्रकृती आता आधीपेक्षा ठीक आहे. परंतु त्यांच्या कुटुंबाला थोडी प्रायव्हसी हवी आहे. त्यामुळेच कोणालाही त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. एकापाठोपाठ एक लोकांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे सुरक्षिततेचि बाब म्हणून दीदींच्या कुटुंबालासुद्धा त्यांना भेटण्यास परवानगी नाही'. काही दिवसांपूर्वी , लता दीदींच्या प्रकृतीबद्दल त्यांची भाची रचना शाहने हेल्थ अपडेट (Health Update) दिली होती. याबद्दल सांगताना रचना शाह म्हणाल्या होत्या की, 'त्यांची प्रकृती स्थिर आहे परंतु सध्या त्यांना ऑक्सिजचा आधार देण्यात आला आहे. त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयात राहावं लागणार आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा असं आवाहन देखील रचना शाह यांनी केले होते.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Coronavirus, Entertainment

    पुढील बातम्या