भारताची गानकोकिळा या तरुणीच्या गाण्याच्या प्रेमात; VIDEO शेअर करत म्हणाल्या...

भारताची गानकोकिळा या तरुणीच्या गाण्याच्या प्रेमात; VIDEO शेअर करत म्हणाल्या...

तरुणीच्या सुरेल आवाजातील गाणं ऐकल्यानंतर लता मंगेशकर स्वत:ला रोखू शकल्या नाहीत.

  • Share this:

मुंबई, 07 जुलै : भारताची गानकोकिळा लता मंगेशकर (lata mangeshkar) यांच्या आवाजाचे दिवाने फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. मात्र लता मंगेशकर एका तरुणीच्या आवाजाच्या प्रेमात पडल्यात. या तरुणीच्या आवाजाने लता मंगेशकर यांचं मन जिंकलं आहे. लता मंगेशकर यांना या तरुणीचा आवाज इतका आवडला की त्या स्वत:ला रोखू शकल्या नाहीत. त्यांनी स्वत: या तरुणीच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

लता मंगेशकर यांना कुणीतरी या तरुणीचा व्हिडीओ पाठवला आणि त्या तरुणीचं गाणं ऐकून त्यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या तरुणीच्या सुरेल आवाजाचं त्यांनी कौतुक केलं आहे  आणि या तरुणीला आशीर्वाद दिले आहेत.

लता मंगेशकर यांनी ट्वीट केलं आहे की, "नमस्कार, मला हा व्हिडीओ कुणीतरी पाठवला होता. ही तरुणी महान ऑस्ट्रियन संगीतकार मोझर्थ यांच्या 40 व्या Symphony G Minor ला भारतीय सरगममध्ये खूप सुंदररित्या गायलं आहे. माझा या तरुणीला आशीर्वाद आहे, ही तरुणी खूप चांगली गायिका बनेल"

हे वाचा - खरा हिरो! भर पावसात वर्सोवा बीच साफ करण्यासाठी पालिकेच्या मदतीला आला रणदीप हुडा

लता मंगेशकर त्यांच्यासमोर मोठमोठे गायक नतमस्तक होतात. लतादीदींचा आशीर्वाद आपल्याला मिळावा असं स्वप्नं प्रत्येक कलाकाराचं असतं आणि हा आशीर्वाद या तरुणीला मिळाल्यानंतर तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. ही तरुणी पश्चिम बंगालची राहणारी आहे. समादीप्ता मुखर्जी असं तिचं नाव आहे.

लतादीदींच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना तरुणी म्हणाली,  "आदरणीय लता मंगेशकरजी, मी तुम्हाला लहानपणापासून पूजते. आज मला खरंच खुद्द देवानेच आशीर्वाद दिला आहे. आता आणखी दुसरं काय हवं. माझ्यावर तुमचा आशीर्वाद असाच कायम राहू दे, जेणेकरून माझ्या संगीत प्रवासात मी खूप उंचावर पोहोचू शकेन"

Published by: Priya Lad
First published: July 7, 2020, 7:58 PM IST

ताज्या बातम्या