मुंबई, २० सप्टेंबर- गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत होताना पाहायचं असेल तर एकदा मंगेशकर कुटुंबियांचा गणपती पाहाच. अनेक वर्षांपासून मंगेशकर कुटुंबिय त्यांच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करतात. स्वतः उषाताई मंगेशकर यांनी हा गणेशोत्सव त्यांच्यासाठी का खास आहे याचं कारण सांगितलं. लवकरच लता मंगेशकराचा ९० वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यांच्या वाढदिवसाला त्यांची भावंड त्यांना एक विशेष भेटवस्तू देणार आहेत. ही भेटवस्तू म्हणजे लतादीदींच्या आयुष्यावर लिहिलेले पुस्तक वाढदिवसाचे औचित्य साधून प्रकाशित करण्यात येणार आहे. याबद्दल अधिक माहिती उषाताईंनी दिली.