लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली म्हटल्यावर त्यांच्या प्रकृतीविषयी सोशल मिडीयावर अनेक व्हायरल मेसेज येत होते. यानंतर मंगेशकर कुटुंबाच्यावतीने चुकीच्या बातम्या पसरू नका असे आवाहन करण्यात आले आहे. वाचा-'माझा होशील ना' फेम सईच्या घरी चिमुकलीचे आगमन, क्यूट VIDEO पाहाच! लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून काम करण्यास सुरू केलं. त्या वडिलांसोबत संगीत नाटकात अभिनय करत होत्या. यानंतर 13 व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं गायलं. भारत रत्न, पद्म भूषण आणि दादासाहेब फाळके यासारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांनी विविध भारतीय भाषांमध्ये 30 हाजारापेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांनी 'अजीब दास्तां हैं ये', 'प्यार किया तो डरना क्या', 'नीला आसमान सो गया' आणि 'तेरे लिए' यासारखी कितीतरी लोकप्रिय गाणी गायली आहेत.There is a marginal improvement in Lata Didi’s health and she continues to be in the ICU: Dr Pratit Samdani, who's treating her at Mumbai's Breach Candy Hospital pic.twitter.com/CRPB9D2r2f
— ANI (@ANI) January 25, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.