Home /News /entertainment /

गानसम्राज्ञी Lata Mangeshkar अजूनही ICU मध्येच, डॉक्टर म्हणाले... "प्रार्थना करा"

गानसम्राज्ञी Lata Mangeshkar अजूनही ICU मध्येच, डॉक्टर म्हणाले... "प्रार्थना करा"

Lata Mangeshkar

Lata Mangeshkar

गानसाम्राज्ञी लता मंगेशकर(Lata Mangeshkar) या गेल्या16 दिवसांपासून आयसीयूमध्ये आहेत. लतादीदींना करोना आणि न्युमोनिया झाल्याने त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    मुंबई, 23 जानेवारी: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar)गेल्या 16 दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने रुग्नालायात उपचार घेत आहेत. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, डॉ. प्रतित समदानी लतादीदींच्या प्रकृती सुधारणेसाठी प्रार्थनेची नितांत गरज असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे चाहत्या वर्गाला त्यांच्या तब्येतीची चिंता लागली आहे. डॉ. प्रतीत समदानी यांच्यासह 5 डॉक्टरांचे पथक लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 8-9 जानेवारीच्या मध्यरात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एएनआयला दिलेल्या माहितीनूसार, डॉ प्रतत समदानी म्हणाले, "कालपासून त्यांची प्रकृती सुधारत आहे, परंतु त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थनेची गरज आहे. लतादीदी यांच्या प्रकृतीत सुधारणेची सकारात्मक चिन्हे दिसत असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्या लवकर बरे होण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. तसेच प्रार्थना करत आहोत. असेही डॉ समदानी म्हणाले. 92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात 'प्रभू कुंज' येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली म्हटल्यावर त्यांच्या प्रकृतीविषयी सोशल मिडीयावर अनेक व्हायरल मेसेज येत होते. अखेर या चर्चेला स्वत: लतादीदींनीच पूर्णविराम दिला आहे. लतादीदींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांची हेल्थ अपडेट शेअर करण्यात आली आहे. लता दीदींच्या अधिकृत ट्विटवरुन 'खोट्या बातम्या पसरवून दीदींच्या चाहत्यांना त्रास देणे बंद करा. कृपया हे लक्षात ठेवा की लतादीदींची प्रकृती स्थिर आहे. त्या लवकरात लवकर घरी जातील यासाठी सर्वांनी प्रार्थना करा.' याआधीही मंगेशकर कुटुंबाच्यावतीने हे आवाहन करण्यात आले होते. कुटुंबाचा खासगीपणा जपण्याचेही आवहनही करण्यात आले.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Coronavirus, Entertainment

    पुढील बातम्या