Home /News /entertainment /

Lata Mangeshkar Health: 'चुकीची माहिती पसरवू नका'; बहीण उषा मंगेशकर यांनी तब्येतीविषयी सांगितली Update

Lata Mangeshkar Health: 'चुकीची माहिती पसरवू नका'; बहीण उषा मंगेशकर यांनी तब्येतीविषयी सांगितली Update

लता दीदी हॉस्पिटलमधून (Lata Mangeshkar Hospitalised) कधी घरी येतील, त्यांची प्रकृती कशी आहे याविषयी माहिती देताना त्यांची बहीण उषा मंगेशकर यांनी माध्यमांनी चुकीच्या बातम्या देऊ नयेत, अशीही विनंती केली.

    मुंबई, 17 जानेवारी- प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना कोरोना (Covid 19) आणि न्युमोनियाची (Lata Mangeshkar corona and neumonia) लागण झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीची चिंता सर्वांनाच लागून आहे. सर्वजण त्या लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, आता त्यांच्या तब्येतीबाबत नवीन माहिती समोर आली आहे. त्यांची बहीण उषा मंगेशकर (Usha Mangeshka) यांनी याबबात माहिती दिली आहे. उषा मंगेशकर म्हणाल्या की, लता दीदींची तब्येत आता सुधारत आहे. मात्र त्यांना प्रकृतीतबाबत काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्या हळूहळू बऱ्या होत आहेत आणि त्यांची तब्येत स्थिर आहे. असे जरी असले तरी त्या कधी घरी परततील हे सांगता येत नाही कारण ते सगळं डॉक्टरांवर अवलंबून आहे.यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, काही माध्यमं चुकीच्या बातम्या देत आहेत. खरं तर हे योग्य नाही. मी माध्यमांनी विनंती करते की, अशा बातम्या देऊ नयेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे असं म्हणत त्यांनी माध्यमांविषयी नाराजी व्यक्त केली. वाचा-Lata Mangeshkar यांच्या प्रकृतीसाठी घरात शिव रुद्र स्थापित: आशा भोसले दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील आज लता दीदींच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. 'लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मी ब्रीच कँडी रुग्णालयात अधिकार्‍यांशी चर्चा झाली असल्याचे टोपे यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच अधिकाऱ्यांना गायिकेच्या प्रकृतीबद्दल अपडेट देत रहावे, कारण लोकांना त्यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घ्यायचे आहे. अशी सूचना देखील दिली असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले. वाचा-'कहो ना प्यार है' या शीर्षक गीतचे गीतकार अब्राहम अश्क काळाच्या पडद्याआड लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. लता दीदींनी 1942 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये 30 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या