मुंबई, 06 फेब्रुवारी: गानकोकिळा लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत या गोष्टीला बरोबर एक वर्ष पुर्ण झालं आहे. दीदी आपल्यात नसल्या तरी त्यांची लाखो गाणी आज आठवस्वरुपी सर्वांबरोबर आहेत. भारतीय संगीतसृष्टीतील त्यांचं योगदान हे फार मोलाचं आहे. त्यांची जागा ना आजवर कोणी घेतली ना कोणी घेईल. आपल्या आजावानं लाखोंच्या मनावर राज्य करणाऱ्या दीदी केवळ भारतात नाही तर विदेशातही तितक्याच प्रसिद्ध होत्या. एक अद्भूत गायिका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. भारताप्रमाणेच लता दीदींनी विदेशातही लाखो कार्यक्रम केलं. पण पहिलं हे सर्वांसाठी फार महत्त्वाचं आणि जवळचं असतं. लता दीदींचा विदेशातील पहिला कार्यक्रम देखील छाती अभिमानानं उंचावणारा होता.
लता दीदींच्या आवाजात एक वेगळाच गोडवा होता. पातळ आवाज असला तरी त्या आवाजात एक तीक्षपणा होता, रेशमी पोत होता, गाण्यातील प्रत्येक शब्दात, उच्चारात कमालीचा गोडवा होता. तमाम भारतीयांप्रमाणेच विदेशातही लता दीदींच्या याच गुणांच्या प्रेक्षकही प्रेमात होते. लता दीदींनी 1974मध्ये पहिल्यांदा लंडनमध्ये कार्यक्रम केला होता. सातासमुद्रापार विदेशातील प्रेक्षकांसमोर गाणं याचं दडपण नक्कीच लता दीदींनाही आलंच असणार. पण त्या शेवटी लता मंगेशकर होत्या. भारतात नाही विदेशातील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत होत्या. विदेशातील पहिल्या कार्यक्रमात जे झालं त्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
हेही वाचा - Lata Mangeshkar: आलिशान घर अन् गाड्या; लतादीदी मागे सोडून गेल्या 'इतकी' संपत्ती; आता कोण आहे वारसदार?
लंडनच्या प्रसिद्ध अशा रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये लता दीदींचा पहिला लाईव्ह शो आयोजित करण्यात आला होता. तेव्हा अनेकांना विश्वास बसला नव्हता पण केवळ दीड तासांत कार्यक्रमाची 18 हजार तिकिटं विकली गेली होती. हे सगळं थक्क करणारं होतं. विदेशात प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम पाहून तेव्हा लता दीदीही भारावून गेल्या होत्या.
लंडनच्या त्या कार्यक्रमानंतर लता दीदींनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, फिजी, वेस्ट इंडिज सारख्या देशातही गाण्यांचे कार्यक्रम केले. विशेष म्हणजे सगळ्याच देशात लता दीदींना दणकून प्रतिसाद मिळाला होता. प्रसिद्ध वादक, संगीत संयोजक आणि संगीतकार अमर हळदीपूर यांनी लोकसत्तात लिहिलेल्या लेखात ही माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.