लता दीदी@90 : अटलजी, लता दीदी आणि नूरजहाँ

लता दीदी@90 : अटलजी, लता दीदी आणि नूरजहाँ

'मै लता जी के चाहने वालो मे हूँ...या वाक्यानं केली. ते लिहितात, त्यांचा स्वर म्हणजे दैवी देणगी आहे. त्यांची गायकी म्हणजे त्यांच्या सतत साधनेचं फळ आहे'

  • Share this:

मुंबई, ता. 28 सप्टेंबर : लता दीदींचे जगभर असंख्य चाहते आहेत. त्यात सामान्य रिक्क्षेवाल्यापासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत अशा सगळ्यांचा समावेश होतो. लता दीदींच्या 'ऐ मेरे वतन के लोगो' या गाण्यामुळं त्यावेळी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात पाणी आलं होत. कवी, साहित्यिक आणि रसिक असलेले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीही लता दीदींचे चाहते होते. लता दीदींबद्दलचं प्रेम त्यांनी एका पत्रात व्यक्त केलंय. ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार यांच्याकडे अटलींचं ते पत्र असून त्यातून लता दीदींबद्दल असलेलं प्रेम आणि आदर दिसून येतो.

लता मंगेशकरांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त भगवान दातार हे 1989 मध्ये एक स्मरणिका तयार करत होते. त्या स्मरणिकेसाठी त्यांनी अटलजींना पत्र लिहून लता दीदींबद्दल लिहिण्याची विनंती केली. त्यांच्या पत्राला अटलजींनी 5 सप्टेंबर 1989 ला उत्तर दिलं. त्या उत्तरात त्यांनी लता दीदींबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

पत्राची सुरूवातच अटलजींनी मै लता जी के चाहने वालो मे हूँ...या वाक्यानं केली. ते लिहितात, त्यांचा स्वर म्हणजे दैवी देणगी आहे. त्यांची गायकी म्हणजे त्यांच्या सतत साधनेचं फळ आहे. त्यांनी केवळ भारतीय भाषांमध्येच नाही तर जगातल्या अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत आणि ती गाणी अजरामर झालीत. त्यांची असाधारण प्रतिभा आणि एकग्रतेचं ते फळ आहे.

त्यांना दुरूनच ऐकण्याचा आणि पाहण्याचा जास्त योग आला. एकदा सांगलीला एका कार्यक्रमात दीदी आणि मी एकत्र येणार होतो मात्र दीदींची प्रकृती बिघडल्याने त्या येवू शकल्या नाही त्यामुळं ती भेट राहून गेली अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

त्याचबरोबर 1977 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झालेल्या भेटीची आठवणही त्यांनी सांगितली. 1977 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांना भेटायला दीदी आल्या होत्या. त्यावेळी मोरारजी देसाई हे युएन प्लाझा हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी अटलजीही तिथे होते.

तेव्हा दीदींनी त्यांना सांगितलं की त्या ज्या हॉटेलमध्ये थांबल्या आहेत त्याच हॉटेलमध्ये पाकिस्तानच्या गायीका नूरजहाँ याही थांबल्या आहेत. मात्र त्यांची भेट झाली की नाही ते अटलजींना आठवत नाही असं प्रांजळपणे त्यांनी पत्रात लिहिलं होतं.

VIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे! असं कोण म्हणालं लतादीदींना?

VIDEO : भररस्त्यावर सपासप वार करून केला खून,पोलिसांची बघ्याची भूमिका

First published: September 28, 2018, 7:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading