रानू मंडलबाबत विचारल्यावर लता मंगेशकर म्हणाल्या...

लता मंगेशकरांचं 'एक प्यार का नगमा है' या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या आणि एका रात्रीत रस्त्यावरून येऊन स्टार झालेल्या रानू मंडल यांच्याबद्दल लताबाई काय म्हणाल्यात बघा...

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 08:40 PM IST

रानू मंडलबाबत विचारल्यावर लता मंगेशकर म्हणाल्या...

मुंबई, 3 सप्टेंबर : 'एक प्यार का नगमा है' हे लता मंगेशकर Lata mangeshkar यांचं गाणं रेल्वेस्टेशनवर गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि Ranu mondal अचानक प्रकाशझोतात आल्या. रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडल एका व्हायरल व्हिडीओमुळे आज बॉलिवूडमधील प्लेबॅक सिंगर झाल्या. त्यांचा हा प्रवास खरंच थक्क करणारा असाच आहे. प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानं त्यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांच अवघं आयुष्य बदललं.

गानसम्रात्रज्ञी लतादीदी यांना रानू मंडलबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न माध्यम प्रतिनिधीने केला. त्यावर नव्वदीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या लता मंगेशकर म्हणाल्या, "माझ्या नावाने आणि मी गायलेल्या गाण्यांनी कुणाचं भलं होत असेल तर मला आनंदच आहे. पण गायकी ओरिजिनल नसेल तर यश अल्पजीवी असतं."

कुठलीही आणि कुणाचीही नक्कल ही जास्त काळ टिकणारी नसते. म्हणून स्वतःचं वैशिष्ट्य शोधावं, असं लतादीदींचं म्हणणं आहे.

हेही वाचा - बॅट सोडून शिखर धवनने हातात धरली बासरी, ऐकून तुम्हीही व्हाल चाहते

सामान्यतः रानू बंगाली बोलतात. मात्र त्या हिंदी सुद्धा बोलू शकतात. त्या जेव्हा 7-8 वर्षांच्या होत्या तेव्हा पासून त्या गात आहेत. रेडिओ आणि टेप वरील रेकॉर्डर ऐकून त्या गाणं शिकल्या आणि मग संधी मिळाल्यावर त्या स्टेजवर गाऊ लागल्या. सुरुवातीला रानू यांनी रेल्वे स्टेशनवर गायला सुरुवात केली होते. त्यावेळी त्यांना गाण्याच्या बदल्यात काही ना काही मिळू लागलं तसं त्यांनी लता मंगेशकर यांची गाणी हूबेहुब त्यांच्या सारखंच गाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना समजलं की गाण्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा खर्च सुटतो आहे. त्यानंतर त्यांनी आणखी चांगलं गाण्याचा प्रयत्न करु लागल्या.

Loading...

हे फोटो पाहा - खान, कपूर, बच्चन यांच्याबरोबर ठाकरे बंधू आणि अनेक क्रिकेटिअर अंबानींच्या घरी

रानू मंडल मूळ पश्चिम बंगालच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचं वय 60 वर्ष असून काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं आहे. त्यांना एक मुलगी आहे. तिनं काही दिवस रानू यांची काळजी घेतली मात्र मागच्या 10 वर्षांपासून तिनं आपल्या आईशी नातं तोडलं. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वेस्टेशनच्या बाजूला रानू यांचं घर आहे. मात्र तिथे तिचं सर्व सामन अस्ताव्यस्त पडलेलं असतं. या घराच्या भिंती कोसळत आहेत. अशा पडझड झालेल्या या घरात रानू एकट्या राहतात.

--------------------------------------

मायलेकीनी धाडस केलं अन् सोनसाखळी चोरांना शिकवला चांगलाच धडा, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 07:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...