लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का? खुद्द दीदींनीच केला खुलासा!

लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का? खुद्द दीदींनीच केला खुलासा!

'सुरूवातीच्या काळात लोक आशा विषयी मला आणि माझ्याविषयी आशाला काही सांगत होते. त्यामुळे गैरसमज निर्माण झाले. तसे आमचे संबंध कधी खराब नव्हतेच'

  • Share this:

मुंबई, ता.23 सप्टेंबर : गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन बहिणींच्या नात्याविषयी कायम चर्चा होत असते. लता दीदी आणि आशा ताईंमध्ये मतभेत आहेत? दीदींनी आशा ताईंना संधी दिली नाही? असे प्रश्न कायम विचारले जातात. दोघी बहिणींमध्ये खरच मतभेद होते का, कसे दूर झाले मतभेद याचा खुलासा खुद्द दीदींनीच 'न्यूज18 लोकमत'ला दिलेल्या एका खास मुलाखतीत केला होता.

दीदी म्हणाल्या, सुरूवातीच्या काळात लोक आशा विषयी मला आणि माझ्याविषयी आशाला काही सांगत होते. त्यामुळे गैरसमज निर्माण झाले. तसे आमचे संबंध कधी खराब नव्हतेच. आम्ही शेजारी राहत होतो, जाणं येणं होतं. पण आशाने लग्न केल्यानंतर परिस्थिती बदलली. आशाचं लग्न ही आम्हा सगळ्या कुटूंबियांसाठी धक्का होता. कारण तीने कुणालाच न विचारता लग्न केलं होतं.

त्याचा सर्वात मोठा धक्का बसला तो आमच्या आईला म्हणजे माईला. तीला एवढा धक्का बसला की ती म्हणाली माझं आता सर्व संपलं. एवढं झाल्यानंतरही आम्ही आशाला काही म्हटलं नाही. मात्र भोसल्यांनी तीला आमच्याशी बोलू नको असं सांगितलं.

नंतर जेव्हा आशाला मुलं झाली तेव्हा मात्र माई म्हणाली तीच्याकडे जावून या, मग ह्रदयनाथ आणि इतर काही जण आशाकडे जावून आले. तेव्हा ती बोलायची. मात्र आमच्या घरी येत नव्हती. नंतर जेव्हा भोसल्यांशी तीचं भांडण झालं त्यानंतर आशा आमच्याकडे यायला लागली. नंतर तीनं आमच्या शेजारी फ्लॅट घेतला आणि सगळं सुरळीत सुरू झालं.

या नात्याबद्दल आशा भोसले यांनीही अनेकदा भाष्य केलं होतं. मात्र स्पष्टपणे त्या बोलल्या नाहीत तरी त्यांनी सगळच काही अलबेल नाही असेही संकेत दिले होते. नुकत्याच एका ताज्या मुलाखतीत त्यांनी राजकारणावर बोलायला नकार दिला. मला राजकारणातलं समजत नाही. घरचच राजकारण मी सांभाळू शकले नाही तर बाहेरच्या राजकारणाबद्दल काय बोलणार असं आशाताईंनी म्हटलं होतं. मात्र हा सगळा इतिहास आहे. आता सगळं सुरळीत सुरू असल्याचे संकेतही त्यांनी अनेकदा आपल्या मुलाखतीतून दिले आहेत.

 

 

 

First published: September 24, 2018, 10:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading