लोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे! असं कोण म्हणालं लता दीदींना?

लोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे! असं कोण म्हणालं लता दीदींना?

लता दीदींना चित्रपट क्षेत्रात आणणारी व्यक्ती होती मास्टर गुलाम हैदर. दीदी सर्व श्रेय मास्टर गुलाम हैदर यांनाच देतात. नेमकं त्यावेळी काय झालं, दीदी कशा आल्या चित्रपट क्षेत्रात हे त्यांच्याच शब्दात...

  • Share this:

मुंबई, ता.23 सप्टेंबर : गेल्या सात दशकांपासून आपल्या अवीट गाण्यांनी आयुष्य समृद्ध करणाऱ्या लता मंगशेकरांचा येत्या 28 सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी 90 वा वाढदिवस आहे. तर दीदींच्या चित्रपट क्षेत्रातल्या कारकिर्दीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. दीदींनी वयाच्या पाचव्या वर्षांपासून गायला सुरूवात केली आणि वयाच्या 13 व्या वर्षी चित्रपटात पहिलं गाणं गायलं. सर्व जगाला आपल्या गाण्यांनी स्वर्गीय आनंद देणाऱ्या लता दीदींना चित्रपट क्षेत्रात आणलं कुणी हा प्रश्न नेहमी विचारला जातो. लता दीदींनी 'न्यूज18 लोकमत'ला काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका खास मुलाखतीत या प्रश्नाचं उत्तर दिलं. दीदींना चित्रपट क्षेत्रात आणणारी व्यक्ती होती मास्टर गुलाम हैदर. दीदी सर्व श्रेय मास्टर गुलाम हैदर यांनाच देतात. नेमकं त्यावेळी काय झालं, दीदी कशा आल्या चित्रपट क्षेत्रात हे त्यांच्याच शब्दात...

मी एकाच व्यक्तिला मानते आणि ते म्हणजे मास्टर गुलाम हैदर. मास्टर विनायकराव गेल्यानंतर दहा दिवसांनी त्यावेळी आमच्या कंपनीत काम करणारे एक कॅमेरामन होते पापा बुलबुले.  ते मला म्हणाले, लता एक म्युझिक डायरेक्टर आहेत ते आधी कोल्हापूरला आले होते त्यांचं नाव आहे हरिषचंद्र बाली. त्यांच्याकडे तू गायला चल. त्यावेळी कंपनी बंद झाली होती. आमच्या नोकऱ्या गेल्या होत्या. त्यामुळं या घरात राहायचं कसं, मुंबईत राहायचं कसं, असा प्रश्न होता. त्यांनी त्यांच्या बाईकवर मला बसवले आणि सेंट्रल स्टुडिओत मला घेऊन गेले. तिथे हरिषचंद्र बालींनी माझं गाण ऐकलं.

गाणं ऐकल्यानंतर ते म्हणाले तु माझ्या गाण्याची रिहर्सलकर. नंतर मी गाणं रेकॉर्ड केलं. त्यावळी तिथे एक पठाण होता. त्यानं माझं गाणं ऐकलं आणि मास्टर गुलाम हैदर यांना सांगितलं.  त्यावेळी मास्टर गुलाम हैदर गाण्यांसाठी एका नव्या मुलीच्या शोधात होते. त्यानंतर त्यांचा निरोप आला की गुलाम हैदर बोलावत आहेत.

मी त्यांच्याकडे गेले. त्यावेळी ते गाणं रेकॉर्ड करत होते. मी दिवसभर बसून होते. कंटाळून गेले होते. माझ्या सोबत माझी मावस बहिण होती, ती मी म्हटलं आक्का किती वेळ बसायचं ग?  नंतर त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि फिल्म वर रेकॉर्ड केलं. नंतर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी बोलावलं.

नंतर त्यांनी ते गाणं एस. मुखर्जींना ऐकवलं. ते म्हणाले हिचा आवाज खूपच पातळ आहे. त्यानंतर मास्टर गुलाम हैदर भडकले.  ते म्हणाले चल मी तुला नेतो माझा पिक्चर सुरू आहे. तिथं गाणं देतो. नंतर त्यांनी एक गाणं रेकॉर्ड केलं.

पण मला इंड्स्ट्रिीत आणलं ते गुलाम हैदर यांनी. नंतर गुलाम हैदर पाकिस्तानात गेले.  त्यावेळी ते म्हणला देखो मेमसाब, लोक नूरजहाँ को भूल जाएंगे, शमशाद को भूल जाऐंगे, बस्स तुम्हे याद रखेंगे.  आणि जेव्हा असं होईल तेव्हा तु मला सांग. नंतर बरसात चं गाणं गाजल्यानंतर त्यांचा पाकिस्तानमधून फोन आला.

ते म्हणाले माझं म्हणणं खरं झालं की नाही? त्यांनी मला आर्शीवाद दिला आणि म्हणाले अशीच गात राहा. त्यानंतर तब्बल 75 वर्ष दीदींनी भारतातल्या अनेक भाषांमध्ये गायलेली गीतं अजरामर ठरली.

First published: September 24, 2018, 10:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading