मुंबई, 1 जून : 80, 90 च्या दशकात आपल्या आवाजाने तरुणांचं हृदय हेलावून टाकणारा गायक केके (Krishnakumar Kunnath) याच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अत्यंत लाजरं व्यक्तीमत्व, मात्र आवाजातील खोलपणा यामुळे केकेची गाणी तरुणांच्या कायम तोंडावर असतात. अशा या दिग्गजाच्या निधनामुळे चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. अवघ्या 53 व्या वयात केकेचं निधन झालं आहे.
कलकत्त्यात गाण्याच्या एका कार्यक्रमादरम्याम मंगळवारी (31 मे)त्याची प्रकृती बिघडली. यानंतर तो हॉटेलमध्ये गेला. येथे तो जमिनीवर कोसळला. यानंतर त्याला तातडीने सीएमआरआय रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित (Singer KK dead) केलं. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, कलकत्त्यातील गुरुदास कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये ते सादरीकरण करीत होते. यादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचं सांगितलं जात आहे. वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी केकेंच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, ही बाब अद्यापही चाहत्यांना पचवणं कठीण झालं आहे.
Unbelievable! Singer KK is no more.
See his energy just few hours before his death during his concert at Kolkata. Life’s truly fragile. Om shanti. #RIPKK pic.twitter.com/wuht8Z82JQ — Akash Jain (@akash207) May 31, 2022
केके आपल्या जादुई आवाजासाठी प्रसिद्ध होता. bluetooth च्या जमान्यातल्या या गायकाने बऱ्याच सुपरहिट गाण्यांना प्ले-बॅक दिला आहे. हम रहे या ना रहे कल... पल याद आयेंगे पल या त्यानेच गायलेल्या गाण्याच्या ओळी आज लागू पडत आहेत. त्याच्या शेवटच्या कार्यक्रमाचे अनेक विडिओ त्याच्या फॅन्सनी शेअर केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Heart Attack, Kolkata