मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ठरणार 'शर्माजी नमकीन'; उरलेली शूटिंग हा अभिनेता करणार

ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ठरणार 'शर्माजी नमकीन'; उरलेली शूटिंग हा अभिनेता करणार

ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी गेल्या वर्षी कर्करोगाशी लढताना जगाचा निरोप (Death) घेतला. त्यांच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची एक आणखी संधी मिळणार आहे. ऋषी कपूर यांचा  शेवटचा चित्रपट (last movie) 'शर्माजी नमकीन' (sharmaji namkeen) यावर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 15 जानेवारी: बॉलीवूड अभिनेते (Bollywood actor) ऋषी कपूर (Rishi kapoor) यांचं गेल्या वर्षी कर्करोगामुळे (Cancer) निधन (death) झालं आहे. ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेत असताना, त्यांची शेवटची कलाकृती चाहत्यांसाठी राखून ठेवली आहे. त्यांच्या शेवटचा चित्रपट अजून रिलीज झाला नाही. त्यामुळे ऋषी कपूर यांनी जरी जगाचा निरोप घेतला असला तरी, चाहत्यांसाठी त्यांना शेवटचं मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी आहे. ऋषी कपूर यांचा  शेवटचा चित्रपट 'शर्माजी नमकीन' (Sharmaji namkeen) यावर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित (Release) होणार आहे.

त्यांचा हा शेवटचा चित्रपट त्यांच्या वाढदिवशी म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येईल, असा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे. त्यांच्या कामाला दिलेला हा सन्मान ठरणार आहे. खरंतर या चित्रपटाचं शूटिंग अद्याप पूर्ण झालेलं नाही. ऋषी कपूर देखील यांच्या  पात्राचं देखील पूर्णपणे चित्रीकरण होऊ शकलं नाही.

अशा परिस्थितीत आता ऋषी कपूर यांच्या व्यक्तीरेखेचा उर्वरित भाग अभिनेता परेश रावल पूर्ण करणार आहे. त्यामुळे हा चित्रपट चित्रपट सृष्टीतल्या इतिहासातला अनोखा चित्रपट ठरणार आहे. असं होणं कदाचित सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच होत असेल. त्यामुळे चित्रपट निर्माते आणि परेश रावल यांनी ऋषी कपूरचा सन्मानार्थ म्हणून हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी ऋषी कपूर आणि परेश रावल या दोघांनी 'पटेल की पंजाबी शादी' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. ऋषी कपूरचा हा चित्रपट चाहत्यांसाठी शेवटची मेजवानी ठरणार आहे. त्यांच्या कला गुणांचा गौरव करण्याची ही शेवटची संधी आहे. मॅकगफिन पिक्चर्ससोबतच रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन हितेश भाटिया यांनी केलं आहे. हा चित्रपट एका 60 वर्षांच्या कथा सांगतो.

First published:

Tags: Bollywood