Home /News /entertainment /

'आम्ही पळून जाऊन लग्न केलंय, आमच्या जीवाला धोकायं' नितीश चव्हाणच्या इन्स्टा पोस्टने खळबळ

'आम्ही पळून जाऊन लग्न केलंय, आमच्या जीवाला धोकायं' नितीश चव्हाणच्या इन्स्टा पोस्टने खळबळ

'लागिर झालं जी' (Lagir Zal Ji) मालिकेतील नितीश चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

  मुंबई, 21 जानेवारी-   गेली चार दिवस 'लागिर झालं जी'   (Lagir Zal Ji)   मालिकेतील ज्ञानेश माने या कलाकाराच अपघाती निधन झालं असताना काही ठिकाणी चुकीचा फोटो व्हायरल होत होता. अभिनेता नितीश चव्हाणचा   (Nitish Chavhan)  फोटो यांच्या जागी व्हायरल होत होता. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. त्यांनतर आता नितीश चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेत्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अशी काही पोस्ट केली आहे, पाहून सर्वच लोक चकित झाले आहेत. 'लागिर झालं जी' या झी मराठीवरील मालिकेमुळे नितीश चव्हाण घराघरात पोहोचला होता. अभिनेत्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे चाहते त्याच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेऊन असतात. नुकताच नितीश चव्हाणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक अशी पोस्ट केली आहे, की सर्वांनां धक्का बसला आहे. नितीश चव्हाणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो एक फलक घेऊन उभा आहे. इतकंच नव्हे तर त्यावर असा एक मजकूर लिहिला आहे. ते पाहून सर्वच चकित झाले आहेत. नितीशने हातात धरलेल्या फलकावर लिहिलं आहे, 'आम्ही पळून जाऊन लग्न केलंय. आमच्या जीवाला धोकायं'. अभिनेता नितीश चव्हाणने पोस्ट शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ' मी आत्तापर्यंत सोशल मेडियावर माझ्या रिलेशन बद्दल सांगितलं नाही कारण घरच्यांचा विरोध होता आणि अजूनही आहे त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. कालच आम्ही पळून जाऊन लग्न केलंय,मला खरतरं हे असं सगळ्यांनसमोर सांगायचं न्हवत पण कालपासून तिच्या घरून मला वारंवार धमक्या येत आहेत म्हणून हे सांगावं लागतंय'.
  नितीश चव्हाणची ही पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तर नेटकरी नितीश आगामी प्रोजेक्टचं प्रोमोशन करत असल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्यानं अजून याबद्दल काही खुलासा केलेला नाही. ही पोस्ट नक्की काय आहे. हे पाहण्यासाठी लोक उत्सुक झाले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment, Tv actor, Zee Marathi

  पुढील बातम्या