• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • आमिर खानचा 'Lagaan' होता चीनमध्ये प्रदर्शित होणारा पहिला बॉलिवूड चित्रपट

आमिर खानचा 'Lagaan' होता चीनमध्ये प्रदर्शित होणारा पहिला बॉलिवूड चित्रपट

या चित्रपटाला याच वर्षी तब्बल २० वर्षे पूर्ण झाली आहेत. सन २००० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

 • Share this:
  मुंबई, 24सप्टेंबर- 'लगान'(Lagan) या चित्रपटाचा हिंदी चित्रपटसृष्टीच्या यशस्वी वाटचालीत एक मोठा वाटा आहे. या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या अत्यंत जवळ पोहोचला होता. तसेच या वर्षी चित्रपटाने तब्बल २० वर्षेसुद्धा पूर्ण केली आहेत. तसेच फारच कमी लोकांना माहिती आहे, 'लगान' हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला बॉलिवूड  चित्रपट होता. अभिनेता आमिर खान आणि ग्रेसी सिंग यांच्या मुख्य भूमिका असणारा 'लगान' हा चित्रपट आहे. हा चित्रपट मेकिंगपासूनच मोठ्या चर्चेत होता. या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले आहेत. तसेच ऑस्करसाठी निवड झालेला हा तिसरा हिंदी चित्रपट होता. यामध्ये करमुक्त होण्यासाठी एक गाव कसं इंग्रजांशी खेळाच्या माध्यमातून लढा देतं हे दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटाला याच वर्षी तब्बल २० वर्षे पूर्ण झाली आहेत. सन २००० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. इतकंच नव्हे तर 'लगान' हा चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिलाबॉलिवूड' चित्रपट होता. चीनमधील शांघाई, बीजिंग या शहरांमध्ये या चित्रपटाचं प्रीमिअर करण्यात आलं होतं. (हे वाचा:आम्ही अजून लग्न नाही केलं...' म्हणत सलमानने केला आपल्या Longest रिलेशनशिपचा... ) 'लगान' हा चित्रपट सर्वांनाच परिचयाचा आहे. हा चित्रपट १९ व्या शतकातील इंग्रज राजवटीवर आधारित आहे. यामध्ये 'चंपानेर' गावाची कथा दाखवण्यात आली आहे. हे एक असं गाव असतं, जे इंग्रजांच्या कराच्या ओझ्याखाली दबलेल असतं. या गावाला करमुक्त व्हायचं असतं. त्यासाठी ते इंग्रजांशी क्रिकेट सामन्याचा करार करतात. यामध्ये जर त्यांनी इंग्रजांचा पराभव केला, तरच त्यांचा कर रद्द करण्यात येणार होता. यासाठी पूर्ण चंपानेर एकत्र येऊन क्रिकेटच्या सामन्याची तयारी करतो. यामध्ये भुवन हा मुख्य अभिनेता असतो. आणि ही भूमिका साकारली आहे. आमिर खानने तर त्याची सह अभनेत्री असते ग्रेसी सिंग. आपण कधीही न खेळलेल्या खेळात या गावकऱ्यांना त्यांचा पराभव करायचा असतो, ज्यांचा हा मातीतला खेळ असतो. हे शिवधनुष्य भुवन पेलतो. आणि गावकऱ्यांच्या साथीने क्रिकेटचा सामना जिंकतो. मात्र या दरम्यान जे-जे संकटे त्यांच्यावर येतात ते सर्वांनाच स्तब्ध करून जातात. (हे वाचा:Shahrukh Khan चं नाव 'इंडियन साईन लँग्वेज डिक्शनरी'त सामील; PM Modi नी केलं...) या चित्रपटाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केलं आहे. तर आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता हे या चित्रपटाचे निर्माता होते. तसेच अनेक कलाकारांची तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली आहे. हा चित्रपट फक्त देशातच नव्हे तर विविध देशांत पसंत करण्यात आला होता.  या चित्रपटाचं एक महत्वाचं सत्य म्हणजे हा चित्रपट सुरुवातीला अभिनेता शाहरुख खानला ऑफर करण्यात आला होता. मात्र शाहरुखच्या नकारनंतर यामध्ये आमिर खानची वर्णी लागली होती.
  Published by:Aiman Desai
  First published: