Home /News /entertainment /

महिला डॉक्टर मॅडीला म्हणाली, 'नशेबाज, ड्रग अ‍ॅडिक्ट....' आर. माधवनने केली तिची बोलती बंद

महिला डॉक्टर मॅडीला म्हणाली, 'नशेबाज, ड्रग अ‍ॅडिक्ट....' आर. माधवनने केली तिची बोलती बंद

आर. माधवनच्या (R. Madhavan) एक उत्तराने त्या महिला डॉक्टरची बोलती बंद झाली आहे. मॅडीचं उत्तर वाचून तुम्हालाही हसू येईल.

    मुंबई, 05 जानेवारी: आजच्या डिजिटल युगात कोण..कधी...कोणाला ट्रोल करेल सांगता येत नाही. आणि त्यात जर एखादी व्यक्ती क्रिकेटर, सेलिब्रिटी किंवा राजकारणी असेल तर काही विचारुच नका. त्यांची चूक असो वा नसो. त्यांना कोणत्याही गोष्टीवरुन ट्रोल केलं जातं. आता ‘रहना हैं तेरे दिल में’मधील मॅडी अर्थात आर. माधवनचंच (R. Madhavan) उदाहरण घ्या ना. एका डॉक्टर महिलेनं फक्त एका फोटोवरुन मॅडीला ट्रोल केलं. मग मॅडीनेही त्या महिलेलं चोख उत्तर दिलं आणि आर. माधवनचे चाहतेदेखील त्याला पाठिंबा देण्यासाठी ट्विटरच्या मैदानात उतरले. झालं असं की, अभिनेता अमित साधने मॅडीसोबत एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. त्यामध्ये त्याने लिहीलं होतं की, ‘ब्रदर, तुम्ही त्या 30 मिनिटांत मला प्रेरणा दिली होती. आय लव्ह यू’ या ट्वीटला अनेकांनी लाइक केलं. रिट्विटही केलं. डॉक्टर अनुष्का भंडारकर नावाच्या एका महिलेने त्यावर अशी प्रतिक्रिया दिली की, ‘एकेकाळी मॅडी माझा आवडता कलाकार होता. पण तो आता दारु आणि ड्रग्जच्या आहारी गेला आहे. त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच सगळं समजतं. रहना हैं तेरें दिल में या चित्रपटात त्याने भूमिका साकारली होती तेव्हा तो फ्रेश दिसायचा.’ युझरच्या प्रतिक्रियेवर आर माधवननेही तिचा चांगलाच समचार घेतला त्याने ट्वीट केलं, ‘ओह तर हा आहे तुझा डायग्नॉसीस? मला तुझ्या पेशंटची काळजी वाटते. कदाचित तुलाच एखाद्या डॉक्टरची गरज आहे.’ आर. माधवननी तिची शाळा घेतल्यावर नेटकऱ्यांनीही तिला चांगलंच सुनावलं. वयाप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यात बदल होणारच. पण फक्त चेहरा पाहून तुम्ही एखाद्या व्यक्तीला नशेबाज कसं म्हणू शकता? असं विचारत अनेकांनी तिच्यावर विनोद केले.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या