पॉप सिंगर लेडी गागानं ट्वीट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियावर खळबळ!

पॉप सिंगर लेडी गागानं ट्वीट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियावर खळबळ!

पॉप सिंगर लेडी गागा ट्विटरवर संस्कृत श्लोक पोस्ट केल्यानं चर्चेत आली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : पॉप सिंगर लेडी गागा नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच स्टेज परफॉर्मन्स दरम्यान घसरून पडल्याचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर आता ट्विटरवर संस्कृत श्लोक पोस्ट केल्यानं ती चर्चेत आली आहे. तिच्या या श्लोकमुळे तिने भारतीय चाहत्यांची मनं जिंकली असली तरीही जगभरातील तिचे इतर चाहते मात्र यामुळे आश्चर्यचकित झाले आहेत. लेडी गागाची ही ट्विटर पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

लेडी गागानं नुकतंच तिच्या ट्विटरवर 'लोकाः समस्ताः सुखिनो भवंतु' हा संस्कृत श्लोक पोस्ट केला. याचा मराठी अर्थ, 'जगातील सर्व लोक सर्व प्रकारे आनंदी राहो' असा होतो. लेडी गागाचं हे ट्विट अवघ्या काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झालं.

स्टार गायिकेचं हे ट्विट वाचून एकीकडे भारतीय चाहते आणि युजर्स खूश झाले असले तरी जगातील इतर चाहते मात्र याचा आर्थ न समजल्याने गोंधळात पडले आहेत. लोक याचा अर्थ आणि त्यामागचा मेसेज शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत 84 हजार लोकांनी हे ट्विट लाईक केलं आहे. तर 21 हजारांहून जास्त लोकांनी ही पोस्ट रिट्विट केली आहे. पण खास करून भारतीय चाहत्यांनी लेडी गागाच्या या ट्विटचं खूप कौतुक केलं आहे.

View this post on Instagram

#AStarIsBorn

A post shared by Lady Gaga (@ladygaga) on

काही दिवसांपूर्वी लास वेगासमधील एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्मन्सवेळी लेडी गागा पाय घसरून पडली होती तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाला होता. लेडी गागा आपल्या एका चाहत्यासोबत स्टेजवर डान्स करत होती. अचानक या चाहत्याचा पाय घसरला आणि त्याच्या सोबत लेडी गागासुद्धा खाली पडली. सुदैवानं यापैकी कोणालाही दुखापत झाली नाही.

==============================================================

लोकसभेचे उमेदवार उदयनराजेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा VIDEO

First published: October 21, 2019, 8:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading