Laal Kaptaan : सेक्रेड गेम्सनंतर सैफ नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा Teaser

Laal Kaptaan : सेक्रेड गेम्सनंतर सैफ नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा Teaser

Laal Kaptaan या सिनेमाचा टीझर नुकताच लॉन्च झाला असून यातील सैफ अली खानचा अनोखा लुक पाहिल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 ऑगस्ट : अभिनेता सैफ अली खान मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिपासून दूर आहे. नुकताच त्याची वेब सीरिज सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन रिलीज झाला. त्यानंतर आता सैफ लाल कप्तान या सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच लॉन्च झाला असून सिनेमातील सैफ अली खानच्या अनोख्या लुकमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सेक्रेड गेम्समध्ये पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसलेल्या सैफला लाल कप्तानमधील नागा साधूच्या लुकमध्ये पाहून सर्वच अवाक झाले आहेत.

या सिनेमाच्या टीझरचा व्हिडिओ समीक्षक तरण आदर्श यांनी त्याच्या ट्विटरवर शेअर केला. या व्हिडिओमध्य सैफ अली खान एका नागा साधूच्या लुकमध्ये दिसत आहे. केसांच्या जटा, कपाळाला लाल टिळा, वाढलेली दाढी आणि चेहऱ्याला राख फासलेल्या अवतारातला सैफ या लुकमध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देतो. या संपूर्ण टीझरमध्ये फक्त एकच डायलॉग ऐकू येतो. ‘हर राम का अपना रावण... हर राम का अपना दशहरा...’ यातून या सिनेमाविषयीची उत्सुकता अधिकच ताणली जाते. मात्र उलगडा मात्र काहीच होत नाही. या टीझरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हा सिनेमा येत्या 11 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. सुरुवातीला हा सिनेमा 6 सप्टेंबरला रिलीज होणार होता मात्र नंतर काही कारणास्तव ही डेट बदलण्यात आली. अनुष्का शर्माच्या NH10 चं दिग्दर्शन करणाऱ्या नवदीप सिंह यांनीच हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. तर सिनेमाची निर्मिती आनंद एल राय यांची आहे. सिनेमाच्या कथेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचं आनंद एल राय सांगतात. या सिनेमात सैफ व्यतिरिक्त झोया हुसैन, दीपक डोबरियाल आणि मानव विज यांच्या महत्तवाच्या भूमिका आहेत.

=====================================================================

पुरामध्ये काढत होता सेल्फी, पाणी वाढले अन्...पाहा हा थरारक VIDEO

Published by: Megha Jethe
First published: August 16, 2019, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading