मुंबई, 07 ऑक्टोबर : सासरी राहून नोकरी आणि संसार सांभाळत असताना माहेरच्यांची देखील तितकीच जबाबदारी स्वीकारणारी आधुनिक विचारांची कुसुम (Kusum) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लागीर झालं जी मालिकेतील शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani bavkar) या मालिकेत कुसुमच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्यासोबत अभिनेता अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware) हा मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे, तो कुसुमचा नवरा दाखवला आहे. अजिंक्य ननावरे याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्याचा मालिकेतील हा नवा लुक आणि नवा अंदाज प्रेक्षकांना चांगलाच आवडलेला दिसत आहे.
अजिंक्य गेल्या सहा वर्षापासून एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करत आहे. ही अभिनेत्री बिग बॉस मराठीमध्ये दिसली (Shivani Surve And Ajinkya Nanaware) होती आणि तिने हिंदी मालिकांमध्ये देखील अभिनयाची छाप सोडली आहे. चला तर मग जाणून घेऊया अजिंक्य ननावरेच्या खऱ्याखऱ्या आयुष्यातील कुसुम बद्दल ...त्याच्या लव्हस्टोरीबद्दल..
अजिंक्य ननावरे हा मूळचा आहे सताऱ्याचा
‘कुसुम’ मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारा अजिंक्य ननावरे हा नुकताच कलर्स मराठी वरील ‘बायको अशी हवी’ या मालिकेत आदित्य राजेशिर्केच्या भूमिकेत दिसला होता. अजिंक्य ननावरे हा मूळचा सताऱ्याचा आहे. मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्याने पदवीचे शिक्षण घेतले असून त्याला अभिनयासोबतच फोटोग्राफीची देखील विशेष आवड आहे. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतून त्याने मराठी मालिका सृष्टीत पदार्पण केले. सख्या रे, तू जीवाला गुंतवावे, गर्ल्स हॉस्टेल या मालिका आणि वाडा चिरेबंदी या गाजलेल्या नाटकातून त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
वाचा :Man Jhala Bajind : 'सरू' आजीनंतर 'फुई' आजीची चर्चा; रणवीर सिंगसोबत देखील केलं आहे काम
गेल्या सहा वर्षापासून करत आहे या अभिनेत्रीला डेट
अजिंक्य गेल्या सहा वर्षांपासून मराठी हिंदी मालिका तसेच चित्रपट अभिनेत्री बिग बॉस फेम “शिवानी सुर्वे” हिला डेट करत आहे. तू जीवाला गुंतवावे या मालिकेत शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे एकत्रित दिसले होते. तेव्हापासूनच त्यांच्यात मैत्री झाली आणि नंचर एकमेकांच्या प्रेमात पडले. या निर्णयाबाबत त्यांनी घरच्यांना देखील सांगितले आहे. त्यांच्या लग्नाला घरच्यांकडून संमती मिळाली आहे मात्र आताच लग्नबांधनात न अडकता आपल्या करिअरकडे लक्ष्य दया’ असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
View this post on Instagram
लवकरच लग्न करणार
अजिंक्यने एका मुलाखतीत शिवानीबद्दल सांगितले होते की, शिवानीने तिचे करिअर स्वतःच्या जिद्दीवर घडवले आहे. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाकीच्या असताना देखील शिवानीने कष्ट करून त्यांना उभारी दिली आहे. त्यामुळे मी तिला खूप जवळून ओळखतो आणि आता लवकरच आम्ही लग्न करण्याच्या विचारात देखील आहोत असे त्याने सांगितले होते.
वाचा :Navratri 2021: पहिल्या दिवशी शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरने धारण केले अंबाबाईचं रुप
देवयानी या मालिकेमुळे शिवानी सुर्वेला प्रसिद्धी मिळाली व ती महाराष्ट्राच्य घराघरात पोहचली. नव्या, फुलवा, अनामिका, जाना ना दिलं से दूर, अशा हिंदी मालिका व ट्रिपल सीट या मराठी चित्रपटात शिवानी मुख्य भूमिकेत दिसली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.