मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कुसुम-अनुजच्या आयुष्यात आलेली एलिशा आहे तरी कोण?

कुसुम-अनुजच्या आयुष्यात आलेली एलिशा आहे तरी कोण?

कुसुम आणि अनुजच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होणार आहे. ही तिसरी व्यक्ती कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून कुसुमचीच बालपणीची मैत्रीण आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 6 डिसेंबर : संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेणारी, आई-वडिलांची काळजी करणारी स्वाभिमानी कुसुम  (kusum)आता अनुज सरनोबत याची बायको झाली आहे. कुसुमची अट अनुजने मान्य केल्याने तिला जपणारा समजुतदार मुलगा अखेरीस तिला मिळाला आहे. कुसुम तिच्या गुणांनी सरनोबतांच्या घरी सगळ्यांची लाडकी झाली आहे. मात्र कुसुम आणि अनुजच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होणार आहे. ही तिसरी व्यक्ती कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून कुसुमचीच बालपणीची मैत्रीण आहे.

सोनी मराठीने नुकाताच एक प्रोमो प्रसिद्ध केला आहे. यामध्ये कुसुम कोणसा तरी भेटायला गेलेली दिसत आहे. यावेळी ती व्यक्ती म्हणते हाय मी एलिशा..यावर लगेच कुसुम म्हणते एलिशाकुस प्रधान आणि मग काय एलिशा देखील कुसुमला ओळखते म्हणते कुसुम देशमुख. तितक्यात अनुज तिथे पोहोचतो आणि कुसुम तिला बालपणीच्या मैत्रिणीची ओळख करून देते. यावेळी अनुजच्या चेहऱ्यावरचा रंग काहीसा उडतो. एलिशाचा आणि अनुज यांच्यात नेमके नाते काय आहे असा प्रश्ना आता सर्वांना पडला आहे.

एलिशाची भूमिका अभिनेत्री केतकी विलास पालव ही साकराणार आहे. यापूर्वी केतकी सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये दिसली होती. तिन जयदीपची मैत्रीण ज्योतिकाची भूमिका साकारली होती. यासोबतच केतकी मटा श्रावणक्वीन स्पर्धेची देखील विजेती ठरलेली आहे. त्यानंतरत तिनं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. आता ती कुसुम मालिकेत दिसणार आहे.

वाचा : 'दोन पाहुणे मात्र आजवर घराबाहेरच ठेवले...'; अमोल कोल्हेंची खास व्यक्तीसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

नेमकी तिची भूमिका काय असणार आहे याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मात्र ती अनुजची एक्स गर्लफ्रेंड असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यामुळे येणाऱ्या भागातच याचा उलगडा होणार आहे. यासोबतच या एलिशाच्या येण्याने या दोघांच्या नात्यावर काय परिणार होणार याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials