कुशल पंजाबीच्या जवळच्या मित्रानं केला मोठा खुलासा, आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

कुशल पंजाबीच्या जवळच्या मित्रानं केला मोठा खुलासा, आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता कुशल पंजाबी आत्महत्येप्रकरणी एक नवा खुलासा.

  • Share this:

मुंबई, 11 जानेवारी : टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता कुशल पंजाबीनं 27 डिसेंबरला आत्महत्या केली होती. त्याच्या अशाप्रकारे अचानक जाण्यानं सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याच्या निधनानंतर अनेक टीव्ही सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच त्याच्या जवळच्या मित्रांनी त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही काही खुलासे केले. कुशल पंजाबीनं मानसिक आणि आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याचे म्हटले जात असले तरी जवळपास सर्वांनीच कुशलच्या आत्महत्येला त्याच्या पत्नीला जबाबदार ठरवलं होते.

दरम्यान आता कुशल पंजाबाची जवळचा मित्र आशिष रॉयनं एक मोठा खुलासा केला आहे. आशिषनं कुशाल पंजाबीच्या वैवाहिक जीवनावर मोठे विधान केले आहे. यात त्यांनी वैवाहिक जीवनात समस्या असल्याचे सांगितले आहे.

वाचा-कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर पत्नीनं केला धक्कादायक खुलासा

आशिष रॉय यांचा मोठा खुलासा

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, आशिषने कौशलच्या विवाहित जीवनात सुरू असलेली समस्या उघड केली आहे. आशिषनं, 'कुशल आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी नव्हता आणि त्यानेच मला हे सांगितले. मात्र कुशल आणि ऑड्री डोलहेन यांच्यातील भांडणात मी कधी मत व्यक्त केले नाही. तसेच, त्याच्यात वाद झाल्याचे ऐकले नाही’, असे सांगितले.

वाचा-कुशल पंजाबी आत्महत्या: वडिलांचा मोठा खुलासा, सांगितलं काय झालं होतं त्या रात्री

डिप्रेशनमुळे कुशाल पंजाबीनं केली होती आत्महत्या

कुशल पंजाबीनं 27 डिसेंबर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर पोलिसांना त्याची सुसाइड नोट मिळाली. ज्यात त्यानं माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये असं म्हटलं होतं तसेच त्याच्या एकूण संपत्ती पैकी 50 टक्के संपत्ती आई-वडीलांच्या नावे तर 50 टक्के संपत्ती 3 वर्षीय मुलगा कियानच्या नावे केल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्याच्या जवळच्या मित्रानं दिलेल्या माहितीनुसार कुशल आणि त्याच्या पत्नीमध्ये मागच्या काही काळापासून वाद सुरू होते आणि त्यांचं नातं तुटण्याच्या मार्गावर होतं. त्यामुळे ती मुलाला घेऊन शंघाईमध्ये राहत होती.

वाचा-'आम्ही हरलो...', कुशल पंजाबीच्या निधनानंतर एकता कपूर भावुक

कुशलच्या पत्नीनं केला होता खुलासा

अमर उजालानं दिलेल्या वृत्तानुसार कुशलच्या आत्महत्येबद्दल पत्नी ऑड्री डोलहेन म्हणाली, आमच्या दोघांमध्ये बरेच वाद झाले होते. आमचं लग्न असफल नव्हतं. मी माझ्या मुलाला कधीच कुशलशी बोलण्यापासून थांबवलं नव्हतं. पण कुशल त्याच्या कुटुंबाबद्दल कधीच गंभीर नव्हता. मी त्याला शंघाईला बोलवलं होतं यासाठी की आम्ही त्याठिकाणी सेटल होऊ शकू. पण त्यानं या गोष्टीला नकार दिला. कुशलची पत्नी पुढे म्हणाली, एवढंच नाही तर मी त्याचा सर्व खर्च करत होते. तो एक बेजबाबदार वडील होता. माझ्या मुलाचाही त्याच्यातील इंटरेस्ट आता कमी होऊ लागला होता. त्याला मुलाच्या भविष्याबद्दल अजिबात काळजी नव्हती. मी मुलासोबत ख्रिसमस हॉलिडेसाठी फ्रान्समध्ये होते. मग मला समजत नाही की या सगळ्याला मला का जबाबदार धरलं जात आहे. आमच्या नात्यात कुशल अयशस्वी ठरला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2020 02:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading